🌿 कोल्हापुरातील कृषी क्षेत्रातील वैभवाचे डिजिटल पोर्टल
  लॉगिन

चाकवत / बटुआ

शास्त्रीय नाव
:
Chenopodium album
प्रकार
:
पालेभाजी
उपयुक्त भाग
:
खोड, पाने
महीना
:
जानेवारी, डिसेंबर, नोव्हेंबर
कुळ
:
Amaranthaceae
हंगाम
:
हिवाळा
प्रदेश
:
-
जिल्हा
:
कोल्हापूर
तालुका
:
आजरा, करवीर, कागल, गगनबावडा, गडहिंग्लज, चंदगड, पन्हाळा, भुदरगड, राधानगरी, शाहूवाडी, शिरोळ, हातकणंगले
गुणधर्म
कॅल्शियम चाकवतामध्ये प्रथिने ३.७%, कॅल्शियम १५० मिली ग्रॅम, फॉस्फरस ८० मिली ग्रॅम, लोह २.४ मिली ग्रॅम, 'क' जीवनसत्व ३५ मिली ग्रॅम असते.
औषधी गुणधर्म
ही पालेभाजी देशभर सर्वत्र सदासर्वदा मिळते. ज्वर, अग्निमांध किंवा दीर्घकाळात तापामुळे तोंडाला चव नसणे, काविळ, छातीत जळजळ अशा नाना तक्रारीत ही भाजी वापरावी. शक्यतो किमान मसालेदार पदार्थाबरोबर ही पातळ पालेभाजी तयार करावी. व्यक्तीजरुन व प्रकृतीप्रमाणे लसुण, आले, जिरे, धने, हिंग, ताक, सैंधव, मिरी, तूप, खडीसाखर, गुळ हे पदार्थ अनुमान म्हणून वापरावेत. आंबट ताकातील चाकवताची पालेभाजी हा उत्तम पदार्थ होय. चाकवत रुचिकर, पाचक, रक्तशोधक, दर्दनाशक, त्रिदोषनाशक, शीतविर्य, बल व शुक्राणुवर्धक आहे. चाकवतामध्ये लोह, क्षार, कॅरोटिन, कॅल्शियम, फॉस्फोरस, पोटॅशियम, प्रोटिन, विटामीन 'सी' व 'बी' युक्त आहे. चाकवत डोळे, लघवी व पोटा संबधी तक्रारीसाठी विशेष लाभदायक आहे.
उपयोग
भाजी, सांडगे, थालीपीठ, चकली
संबंधित पाककृती
हरभऱ्याची भाजी
हरभऱ्याची भाजी
  36
चिवळ भाजी
रानघोळ, भुईचौली, खाटेचौनाळ, चिवळी, लहान घोळ व छोटी घोळ
  36
घोळ भाजी
घोळभाजी / Benghal Deflower
  31
दिंड्याची भाजी
दिंडा / ढोलसमुद्रिका
  18
उत्पादक शेतकरी
संजीवनी महिला शेतकरी गट
मो.नं : 8553654567
हरली खुर्द
संघटीत महिला स्वय सहाय्यता गट
मो.नं : ७६२०००६२११
कुडूत्री
दुर्गा महिला शेतकरी गट
मो.नं : 7385676545
उंबरवाडी