🌿 कोल्हापुरातील कृषी क्षेत्रातील वैभवाचे डिजिटल पोर्टल
  लॉगिन
कृषी विभाग व आत्मा (ATMA) कोल्हापूर

वेबसाईट बाबत प्रकल्प संचालकांचे मनोगत

निसर्गाची समृद्ध आरोग्यसंपदा: आपल्या रानभाज्या!

नमस्कार,

कोल्हापूर जिल्हा विशेष संदेश

कोल्हापूर जिल्हा हा केवळ संस्कृती आणि परंपरेचाच नव्हे, तर नैसर्गिक जैवविविधतेने आणि सुपीकतेने नटलेला जिल्हा आहे. आपल्या मातीत अनेक दुर्मिळ, पौष्टिक आणि औषधी गुणधर्मांनी नटलेल्या रानभाज्यांचा अनमोल ठेवा दडलेला आहे. पावसाळ्याच्या दिवसांत आणि त्यानंतर नैसर्गिकरीत्या उगवणाऱ्या या रानभाज्या आपल्या पूर्वजांच्या आहाराचा मुख्य भाग होत्या. मात्र, काळाच्या ओघात आणि बदलत्या जीवनशैलीमुळे या रानभाज्यांची ओळख आणि त्यांचे आरोग्यदायी महत्व काहीसे मागे पडत चालले होते.

कृषी विभाग व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), कोल्हापूर यांच्या माध्यमातून स्थानिक व पारंपरिक रानभाज्यांचे महत्व, त्यांचे औषधी गुणधर्म आणि विविध पाककृती नागरिकांपर्यंत सहज पोहोचाव्यात, यासाठी आम्ही ही विशेष डिजिटल प्रणाली/वेबसाईट विकसित केली आहे.

या वेबसाईटची मुख्य वैशिष्ट्ये

रानभाज्यांची ओळख व आरोग्यदायी महत्व

कोल्हापूर जिल्ह्यातील विविध तालुक्यांत आढळणाऱ्या दुर्मिळ रानभाज्यांची सविस्तर माहिती आणि त्यांच्या सेवनाने होणारे आरोग्यदायी फायदे.

पारंपरिक पाककृती

रानभाज्यांपासून बनवले जाणारे चवदार व पौष्टिक पदार्थ तयार करण्याच्या पारंपरिक पद्धती व पाककृती.

शेतकऱ्यांची भेट माहिती

कोल्हापूर जिल्ह्यातील ज्या शेतकरी बांधवांकडे व महिला बचत गटांकडे या रानभाज्या उपलब्ध आहेत, त्यांची नावे, संपर्क क्रमांक व तालुकानिहाय माहिती.

या उपक्रमामुळे जिथे एकीकडे कोल्हापूरकर नागरिकांना उत्तम आरोग्यासाठी व रसायनरहित रानभाज्या थेट उपलब्ध होतील, तिथे दुसरीकडे आपल्या ग्रामीण भागातील शेतकरी, शेतकरी उत्पादक कंपन्या व महिला बचत गटांना हक्काची बाजारपेठ मिळून त्यांच्या आर्थिक सक्षमकरणाला चालना मिळेल.

नागरिकांनी या वेबसाईटचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा आणि आपल्या दैनंदिन आहारात या निसर्गदत्त रानभाज्यांचा समावेश करून निरोगी जीवनशैलीकडे पाऊल टाकावे, हेच आमचे नम्र आवाहन आहे. आपल्या निसर्गाचा हा अनमोल ठेवा जपूया, निरोगी व समृद्ध कोल्हापूर घडवूया!

आपली नम्र,

श्रीमती रक्षा शिंदे

प्रकल्प संचालक, आत्मा (ATMA)

कोल्हापूर