🌿 कोल्हापुरातील कृषी क्षेत्रातील वैभवाचे डिजिटल पोर्टल
  लॉगिन

वेळू / वास्ते / काष्ठी / कळक / माणगा / Bamboo

शास्त्रीय नाव
:
Bambusa arundinacea (Retz.) Wild
प्रकार
:
कंद / मुळ
उपयुक्त भाग
:
कोवळे कोंब
महीना
:
ऑगस्ट, जून, जुलै
कुळ
:
Poaceae
हंगाम
:
पावसाळा
प्रदेश
:
डोंगराळ भाग, पावसाळी भाग, शेताच्या बांधावर
जिल्हा
:
कोल्हापूर
तालुका
:
आजरा, करवीर, कागल, गगनबावडा, गडहिंग्लज, चंदगड, पन्हाळा, भुदरगड, राधानगरी, शाहूवाडी, शिरोळ, हातकणंगले
गुणधर्म
शक्तीवर्धक बांबूमध्ये जीवनसत्व व कॉम्प्लेक्स - थायामीन, रिबोफ्लेविन, नियामिन, बी-६ (पायरीडॉक्सिन) आणि पॅटोथिनिक ऐसिड, पोटॅशियम, कॅल्शियम, तंतुमय पदार्थ, कमी प्रमाणात प्रथिने व फॉस्फरस आहे. • जीवनसत्व ब हे तोंड, जीभ व डोळे यांच्या करीता आवश्यक आहे. त्वचा, हाडे, केस, रक्तपेशी, मज्जातंतू व पचनसंथा स्वस्थ ठेवते. रोग प्रतीकारक शक्ती वाढवते. • पोटॅशियम स्नायूचे आकुंचन होण्यासाठी आवश्यक आहे. • कॅल्शिअम व फास्फोरस हाडे व दातांना मजबुती देते. • तंतुमय पदार्थ पचन करण्यास मदत करते. • प्रथिने शरीराची झीज भरुन काढते. • बांबू हा क्षारयुक्त आहे. यातील तंतू आणि क्षार शरीरासाठी खूप फायदेशीर आहेत.
औषधी गुणधर्म
बांबूचे कोंब, पेर, पाने, अंकुर, फुले सर्व औषधी आहेत. बांबूच्या कोंबाचा शक्तीवर्धक म्हणून उपयोग आहे. • जखमेतील किडे काढण्याकरीता बांबूच्या कोंबाचे पोटीस बांधतात. • बांबूचा कोवळा भाग श्वसन विकारावर उपयोगी आहे. कोवळे कोंब कुटून सांधेसुजीत बांधतात. • कोवळ्या कोंबाचे लोणचे अपचनात उपयुक्त आहे. भाजीमुळे भूक व पचनशक्ती वाढते. • बाळंतपणानंतर गर्भाशयाची पूर्ण शुद्धी होण्यासाठी ही भाजी बाळंतीणीला देतात. • मासिक पाळी नियमित घेण्यासाठी बांबूची भाजी उपयुक्त आहे. • बांबू खोडांच्या पेऱ्यात तयार होणारे वंशलोचन हे दम्यावरील उत्तम औषध आहे.
उपयोग
वडे, पातळ भाजी, सुकी भाजी, लोणचे
संबंधित पाककृती
मायाळु भजी
पोई / पोईन / पवन / मायाळू / वावडींग / Indian spinach / Malbar spinach / Ceylon Spinach
  28
आळुवडी
अळु / धोपा / टारो (Taro)
  28
शेंडवल भाजी
मोहोर / मंजीरी / शेंडवेल / शेंदूरवेल / मांदा / येलेरगडू / करांदी
  24
उत्पादक शेतकरी
दुर्गा महिला शेतकरी गट
मो.नं : 7385676545
उंबरवाडी
संघटीत महिला स्वय सहाय्यता गट
मो.नं : ७६२०००६२११
कुडूत्री
संजीवनी महिला शेतकरी गट
मो.नं : 8553654567
हरली खुर्द