🌿 कोल्हापुरातील कृषी क्षेत्रातील वैभवाचे डिजिटल पोर्टल
  लॉगिन

वरुण / हाडवर्णा / वायवर्णा

शास्त्रीय नाव
:
Crataeva adanson
प्रकार
:
पालेभाजी
उपयुक्त भाग
:
पाने, साल
महीना
:
ऑगस्ट, जून, जुलै, सप्टेंबर
कुळ
:
Capparidaceae
हंगाम
:
पावसाळा
प्रदेश
:
डोंगराळ भाग, शेताच्या बांधावर
जिल्हा
:
कोल्हापूर
तालुका
:
आजरा, करवीर, कागल, गगनबावडा, गडहिंग्लज, चंदगड, पन्हाळा, भुदरगड, राधानगरी, शाहूवाडी, शिरोळ, हातकणंगले
गुणधर्म
- 1.सालीचा काढा सारक असून तो अश्मरीवर(मुतखडा) व मूत्रमार्गाच्या तक्रारींवर देतात. पानांचा रस पाय सुजणे, तळव्याची आग इत्यादींवर गुणकारी आहेत. 2. वायवर्णा ची साल व पान औषधात वापरतात. वायवर्णा कडू, दीपक, पित्तासारक, वातहर, मुत्रजनक व उष्ण आहे. 3. सालीत “सॅपोनीन” सारखे द्रव्य असते. सालीच्या अर्काने तेलाचे दुग्धीकरण होत म्हणून ह्याच्या सालीचा उपयोग शरीरातील चरबी कमी करण्या साठी होतो. 4. हि वनस्पती वायू, मुत्रघात, मुतखडा, गंडमाळ या वर उपयुक्त आहे. 5. गालगुंडावर वायवर्णा ची साल आणि पुनर्नवा समभाग घेऊन गळ्यावर बांधल्यास सूज नाहीशी होते . 6. गंडमाळवर वायवर्णा ची साल व कांचणार ची साल मध घालून देतात. 7. तापतील भ्रम उतरविण्यास वायवर्णा ची साल ठेचून डोक्यावर बांधतात
औषधी गुणधर्म
• वायवर्णा कडू, दीपक, कोष्ठवात प्रशमक, पित्तसादक, आनुलोमिक, वातहर, मूत्रजनक, शोथन व उष्ण आहे. • सालीत 'सॅपोनीन' सारखे द्रव्य असते. • ही वनस्पती वायू, मूत्रघात, मूत्रखंड, गंडमाळ यावर उपयुक्त आहे. • गालगुंडावर व गंडमाळावर वायवर्णाची साल व कांचनारची साल मध घालून देतात व तिचा लेप करतात. • मूतखड्यावर वायवर्णा, गोखरू व सुंठ समभाग घेऊन काढा करून त्यात यवक्षार व गूळ घालून द्यावा. • वातरोगावर वायवर्णाच्या पानांचा रस तूप घालून घ्यावा. • पोटदुखी व कुपचनात पानांचा रस देतात. • ज्वरातील भ्रम उतरण्यास वायवर्णाची साल ठेचून डोक्यावर बांधतात.
उपयोग
वायवर्णाची भाजी
संबंधित पाककृती
करडईची सुकी भाजी
करडई पाने
  18
चिवळ भाजी
रानघोळ, भुईचौली, खाटेचौनाळ, चिवळी, लहान घोळ व छोटी घोळ
  35
आंबटचुका डाळभाजी
आंबटचुका / ब्लॅडर डॉकसॉरेल/ चुका
  22
हरभऱ्याची भाजी
हरभऱ्याची भाजी
  36
उत्पादक शेतकरी
संजीवनी महिला शेतकरी गट
मो.नं : 8553654567
हरली खुर्द
दुर्गा महिला शेतकरी गट
मो.नं : 7385676545
उंबरवाडी
संघटीत महिला स्वय सहाय्यता गट
मो.नं : ७६२०००६२११
कुडूत्री