🌿 कोल्हापुरातील कृषी क्षेत्रातील वैभवाचे डिजिटल पोर्टल
  लॉगिन

आघाडा

शास्त्रीय नाव
:
Achyarnthes Aspera
प्रकार
:
पालेभाजी
उपयुक्त भाग
:
पाने, बिया
महीना
:
ऑक्टोबर, ऑगस्ट, जुलै, नोव्हेंबर, सप्टेंबर
कुळ
:
Amaranthaceae
हंगाम
:
पावसाळा
प्रदेश
:
-
जिल्हा
:
कोल्हापूर
तालुका
:
आजरा, करवीर, कागल, गगनबावडा, गडहिंग्लज, चंदगड, पन्हाळा, भुदरगड, राधानगरी, शाहूवाडी, शिरोळ, हातकणंगले
गुणधर्म
- आघाडा कडू, तिखट, उष्ण, रेचक, दीपक, वायुनाशी, आम्लतानाशक, रक्तवर्धक, मूत्रजनक, मूत्राम्लतानाशक, स्वेदजनन, कफघ्न, पित्तसारक गुणधर्माचा आहे. ही वनस्पती भूक वाढवणारी, वात, हृदयरोग, मूळव्याध, मुतखडा, पोटदुखी, जलोदर, अपचन, आमांश, रक्तरोग, श्वासनलिका दाह इत्यादी रोग व विकारांत उपयुक्त आहे. आघाड्याची राख वैद्यकीय द्रवात अग्रगण्य आहे. आघाड्याचा क्षार, मज्जातंतू व हाडांना, तसेच रक्तकणांना उपयुक्त आहे. आघाडा वनस्पती वाळवून नंतर जाळली जाते. त्यापासून मिळवलेली राख पाण्यात मिसळतात. वस्त्रगाळ करून गाळलेले पाणी उन्हात सुकवतात. त्यापासून मिठासारखा क्षार जमतो. या क्षारामध्ये चुना, लोह, जवखार, मीठ, गंधक, सोरा खार इत्यादी घटक असतात. जेवण्यापूर्वी आघाड्याचा काढा दिल्यास पाचक रस वाढतो, तर जेवणानंतर दिल्यास आम्लता कमी होते.
औषधी गुणधर्म
यकृतावर आघाड्याची क्रिया फार हितावह आहे. यामुळे यकृताच्या सर्व क्रिया सुधारतात. पित्ताश्मरीत व अर्श रोगात आघाडा वापरतात. आमवात, क्षारयुक्त संधिशोथ, गंडमाळा या रोगांत आघाडा गुणकारी आहे. आघाडा मूत्रजनन आहे. त्याची क्रिया मूत्रपिंडातील मूत्रजनक पेशींवर होते. यामुळे आघाडा मूत्रपिंडोदरात उत्तम कार्य करतो. आघाड्यामुळे लघवीची आम्लता कमी होते. मूत्रनलिकेचा दाह आघाड्यामुळे कमी होतो. यामुळे बस्तिशोथ, मूत्रपिंड शोथ, तसेच मूत्रेंद्रियांच्या रोगात आघाडा वापरतात. अंगातील जास्त चरबी कमी होण्यासाठी आघाड्याच्या बिया उपयुक्त आहेत. श्वासनलिकाशोथ व कफरोगात आघाड्याचा क्षार हे दिव्य औषध आहे. विषमज्वरात आघाड्याची राख किंवा मुळाचे चूर्ण खायच्या पानांच्या रसातून देतात. आघाड्यात विषनाशक गुणधर्म आहेत. उंदराच्या विषावर कोवळ्या पानांचा व तुऱ्यांचा रस मधाबरोबर देतात. विंचूदंशावर आघाड्याचा पाला वाटून लावतात व मूळ उगाळून पिण्यास देतात. रातांधळेपणात आघाड्याच्या मुळाचे चूर्ण देतात. दातदुखीत पानांचा रस हिरड्यांवर चोळतात किंवा आघाड्याचा क्षार किडलेल्या दातांच्या ढोलीत भरतात. चामखीळ काढण्यासाठी क्षार वापरतात. कानात मळ साठून कानदुखी किंवा कानात सतत नाद व आवाज होणे या विकारात आघाड्याचा क्षार तिळाच्या तेलात उकडून, वस्त्रगाळ करून ते तेल कानात घालतात. संधिशोथात आघाड्याची पाने ठेचून, गरम करून दुखणाऱ्या सांध्यावर बांधतात. अंगात काटे शिरल्यास आघाड्याचा अंगरस देतात व पाने वाटून जखमेवर लावतात. मज्जातंतू व्यूहाच्या रोगात आघाड्याच्या अंगरसाने फायदा होतो. आघाड्याच्या मुळाचा फांट आतड्याच्या रोगात उपयुक्त आहे. आघाड्याच्या बिया वांतिकारक आहेत, तसेच बीजचूर्ण शिरोवेरेचक आहे. आघाड्याची राख बाह्य त्वचेवरील व्रणांसाठी उपयुक्त आहे.
उपयोग
आघाडची भाजी
संबंधित पाककृती
कुरडूची भाजी
कुरडू / कुंजर/ कुंदर
  27
गावठी अळंबी सावजी स्टाईल
अळंबी / कुत्र्याची छत्री / सात्या / डुबरसात्या / भूछत्र /Mushroom
  28
हादगा भजी
अगस्ता / हादगा / अगस्त्य
  17
उत्पादक शेतकरी
श्री तुकाराम झलग
मो.नं : 9552087531
लक्ष्मीवाडी
दुर्गा महिला शेतकरी गट
मो.नं : 7385676545
उंबरवाडी
श्री शरद पाटील
मो.नं : 9767235600
तासगाव ता. हातकणंगले
सौ माया नाईक
मो.नं : 8806870718
बिरदेववाडी