🌿 कोल्हापुरातील कृषी क्षेत्रातील वैभवाचे डिजिटल पोर्टल
लॉगिन
कोल्हापुर कृषीवैभव
कृषी विभाग, कोल्हापूर महाराष्ट्र शासन
मुख्यपृष्ठ
आमच्याविषयी
रानभाज्या
तालुका निहाय रानभाजी
पाककृती
उत्पादक
उत्पादक नोंदणी
लेख पोस्ट करा
उत्पादक यादी
महोत्सव
लेख
संपर्क
भारंगीची भाजी
साहित्य
भारंगीची कोवळी पाने (देठ काढून टाकावेत) अर्धी वाटी चिरलेला कांदा ५-६ लसूण पाकळ्या ठेवून घ्याव्यात मीठ तिखट गुळ तेल हिंग मोहरी हळद
बनवण्याची पद्धत
जास्त तेलावर कांदा-लसूण परतून घ्यावी, त्यावर चिरलेली भारंगीची पाने घालावीत. झाकण ठेवून वाफ काढावी. पाण्याचा थोडा हक्का मारावा. तिखट, मीठ, हळद, थोडा गूळ व हिंग घालून शिजवून उतरवावे. भारंगीची भाजी कडु असल्याने शिजवून पाणी काढून करतात.
फायदे
सर्दी आणि खोकला दूर करते: सर्दी, खोकला, घशातील खवखव आणि छाती भरणे या विकारांवर भारंगी अत्यंत गुणकारी आहे. यात दाहक-विरोधी (anti-inflammatory) गुणधर्म असतात, जे श्वसनमार्गातील सूज कमी करतात. दम्याचा त्रास किंवा दमा होऊ नये म्हणून कोकणात आजही भारंगीच्या पानांच्या भाजीचा वापर केला जातो. ही श्वसनक्रिया सुधारण्यास मदत करते. पचनक्रिया सुधारते: भूक वाढवणे आणि पचनक्रिया सुरळीत ठेवण्यासाठी ही भाजी उपयुक्त आहे. यामुळे गॅस, अपचन, एनोरेक्सिया (क्षुधानाश) आणि बद्धकोष्ठता यांसारख्या समस्या दूर होतात. ताप आणि कफ कमी करते: ही वनस्पती कफ बाहेर टाकण्यास आणि ताप (antipyretic) कमी करण्यास मदत करते. ऍलर्जी कमी करते: भारंगीमध्ये ऍलर्जी-विरोधी गुणधर्म असतात, ज्यामुळे शरीरातील ऍलर्जीक प्रतिक्रिया कमी होण्यास मदत होते.
संबंधित भाजीच्या पाककृती/रेसिपी
कढीपत्ता चटणी
कडीपत्ता / गोडनींब / Curry Leaves
25
आघाडची भाजी
आघाडा
42
आघाड्याची भाजी
आघाडा
36
मोरशेंड पानांची भाजी
मोरशेंड
42
संबंधित भाज्या
करडकोसला / कुसंबा / करड कुसुंबा / घेटुर / Indian Cornflower
Goniocaulon indicum (Klein ex Wild.) Cl.
लाल माठ / लाल भाजी / श्रावणी माठ / Red Amaranth / Blood Amaranth
Amaranthus Cruentus L.
विंचू / विचवा / बेचका / Creeping Cradle Plant
Cyanotis axillaris
चवळी / CHAVALI
Amaranthus viridis