🌿 कोल्हापुरातील कृषी क्षेत्रातील वैभवाचे डिजिटल पोर्टल
लॉगिन
कोल्हापुर कृषीवैभव
कृषी विभाग, कोल्हापूर महाराष्ट्र शासन
मुख्यपृष्ठ
आमच्याविषयी
रानभाज्या
तालुका निहाय रानभाजी
पाककृती
उत्पादक
उत्पादक नोंदणी
लेख पोस्ट करा
उत्पादक यादी
महोत्सव
लेख
संपर्क
टाकळ्याची भाजी
साहित्य
1 जुडी टाकळा 2 टेबलस्पून मुग डाळ 1 कांदा 3-4 हिरव्या मिरच्या 5-6 लसूण पाकळ्या 2 टेबलस्पून ओल्या खोबऱ्याचा कीस 1/2 टेबलस्पून हळद 1/2 टेबलस्पून मीठ
बनवण्याची पद्धत
टाकळ्या ची फक्त्त पाने निवडून घ्यावी. स्वच्छ धुऊन गरम पाण्यात उकळवून घ्यावीत. अर्धा तास आधी मुगाची डाळ स्वच्छ धुऊन भिजत घालावी कांदा मिरची चिरुन घ्यावे. लसूण सोलून बारीक चिरून घ्यावा. गॅसवर मध्यम आचेवर पॅन मध्ये तेल घेऊन ते तापल्यावर त्यात लसूण घालावा. लसूण लाल झाला की मिरची घालून त्यात कांदा घालावा. कांदा गुलाबी झाल्यावर त्यात मुगाची डाळ निथळून घालावी. हळद घालून ढवळून घ्यावे. झाकण ठेवून डाळीला एक वाफ काढावी. त्यात उकळून घेतलेली टाकळ्याची भाजी पाणी काढून घालावी. मीठ घालून भाजी ढवळून घ्यावी. वरून ओल्या खोबऱ्याचा कीस घालावा. टाकळ्याची भाजी तयार. भाकरी बरोबर ही भाजी मस्त लागते.
फायदे
त्वचाविकारांवर गुणकारी: टाकळा भाजी खाल्ल्याने इसब (Eczema), ॲलर्जी, सोरायसिस, खरुज आणि गजकर्ण यांसारखे त्वचाविकार दूर होण्यास मदत होते. वात व कफ दोष कमी करते: ही भाजी गुणाने उष्ण असल्यामुळे शरीरातील वात आणि कफ दोष नियंत्रित ठेवण्यास मदत करते. पोटातील कृमी नष्ट करते: लहान मुलांच्या पोटातील जंत किंवा कृमी बाहेर टाकण्यासाठी ही भाजी उपयुक्त ठरते. वजन नियंत्रित ठेवण्यास मदत: नियमित सेवनाने शरीरातील अतिरिक्त मेद (चरबी) कमी होण्यास मदत होते. रक्त शुद्धीकरण: ही रानभाजी नैसर्गिकरीत्या रक्त शुद्ध करण्याचे कार्य करते, ज्यामुळे आरोग्य सुधारते. पोषक घटकांचे प्रमाण: टाकळ्यात फायबर, प्रथिने, ब्युटा-कॅरोटीन, तसेच जीवनसत्त्वे (अ, बी, सी) आणि लोह, कॅल्शियम यांसारखी खनिजे भरपूर प्रमाणात असतात
संबंधित भाजीच्या पाककृती/रेसिपी
टाकळ्याची भाजी
टाकळा / तरोटा / तरवटा / Foetid Cassia
47
टाकळा रानभाजी
टाकळा / तरोटा / तरवटा / Foetid Cassia
33
कुड्याच्या फुलांची भाजी
कुडा / इंद्रजव / कुटज / पांढरा कुडा / Konesi Bark Tree
36
कपाळफोडी ची भाजी
कपाळफोडी / फोफांडा
15
संबंधित भाज्या
केळ फुले भाजी
Musa acuminata
कुडा / इंद्रजव / कुटज / पांढरा कुडा / Konesi Bark Tree
Holarrhena pubescens
टाकळा / तरोटा / तरवटा / Foetid Cassia
Cassia Tora
जिवती / ज्योती / दौडी / वसू / झुटेलची फुले / Telosma Vine
Telosma pallida (Roxb.) Craib