🌿 कोल्हापुरातील कृषी क्षेत्रातील वैभवाचे डिजिटल पोर्टल
लॉगिन
कोल्हापुर कृषीवैभव
कृषी विभाग, कोल्हापूर महाराष्ट्र शासन
मुख्यपृष्ठ
आमच्याविषयी
रानभाज्या
तालुका निहाय रानभाजी
पाककृती
उत्पादक
उत्पादक नोंदणी
लेख पोस्ट करा
उत्पादक यादी
महोत्सव
लेख
संपर्क
अंबाडीची भाजी
साहित्य
१ जुडी अंबाडीची पानं (साधारण दीड कप भाजी चिरून) 1/4 कप तांदूळ 1/4 कप चणाडाळ ४-५ लाल सुक्या मिरच्या १२ पाकळ्या लसूण चवीनुसार मीठ 1 टेबलस्पून तेल 1/4 चमचा मोहरी 1/2 चमचा हळद चिमूटभर हिंग ४-५ मेथी दाणे
बनवण्याची पद्धत
तांदूळ आणि चणाडाळ धुवून वेगवेगळी ६ तास भिजत घाला. अंबाडीची पानं काढून धुवून घ्या. फक्त पानं काढा - देठ घेऊ नका. पानं बारीक चिरून घ्या. डाळ, तांदुळातलं पाणी काढून टाका. आणि तांदूळ हाताने थोडे चुरून घ्या. एका पातेल्यात तेल गरम करून मोहरी, हळद, हिंग घालून फोडणी करा. फोडणीत मेथी दाणे घाला. लसणीचे मध्यम तुकडे करून फोडणीत घाला आणि गुलाबी रंगावर परतून घ्या. लाल मिरच्यांना मध्ये चीर देऊन त्या फोडणीत घाला. आता त्यात चिरलेली अंबाडी तांदूळ आणि डाळ घाला. एकदा ढवळून झाकण ठेवून पाणी न घालता वाफ काढा. मिश्रण बुडेल एवढं पाणी घाला. मीठ घाला. भाजी शिजवण्यासाठी मी प्रेशर कुकर वापरते. भाजीची पातेली प्रेशर कुकर मध्ये ठेवून २ शिट्या काढल्या की भाजी शिजते. तुम्हाला प्रेशर कुकर वापरायचा नसेल तर त्याच पातेल्यात मंद आचेवर भाजी शिजवून घ्या. मध्ये मध्ये ढवळत राहा आणि लागलं तर थोडं पाणी घाला. प्रेशर कुकर मध्ये शिजवलेली भाजी बाहेर काढून पातळ / दाट हवी असेल त्यानुसार पाणी घाला / आटवा. हे करताना गॅस बारीक ठेवा. चविष्ट आणि पौष्टिक अंबाडीची भाजी तयार आहे. भाकरी / पोळीबरोबर किंवा नुसतीच भाजी खायला द्या. खाताना वरून थोडं कच्चे शेंगदाणा तेल घातलं तर भाजी आणखी स्वादिष्ट लागते.
फायदे
हृदय निरोगी ठेवण्यासाठी फायदेशीर आहे. उच्च रक्तदाब कमी करण्यास मदत करते. खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यास फायदेशीर आहे. वजन कमी करण्यासाठी आरोग्यदायी पर्याय आहे. यामध्ये कॅलरी कमी असतात. भरपूर जीवनसत्त्वे आणि तंतुमय घटक असतात. जीवनसत्त्व अ, लोह, झिंक मुबलक प्रमाणात असल्याने डोळ्यांच्या आरोग्यासाठी उपयुक्त. यामध्ये जीवनसत्त्वे आणि प्रथिने भरपूर प्रमाणात आहेत. केस मजबूत आणि निरोगी होतात. केस गळणे किंवा सहजपणे तुटणे टाळता येते. यामध्ये कॅल्शिअम असल्याने हाडे मजबूत करण्यास मदत करते. ऑस्टियोपोरोसिस आजारापासून संरक्षण मिळते. लोहाचे प्रमाण जास्त असल्याने हिमोग्लोबिन वाढविण्यासाठी फायदेशीर आहे. रक्तल्पता किंवा ॲनिमिया आजार असणाऱ्यांनी दैनंदिन आहारामध्ये अंबाडी भाजीचा समावेश करावा. अंबाडीमध्ये डाययुरेटिक गुण असल्याने लघवीला जळजळ होणे, उन्हाळे लागणे यावर ही भाजी उपयुक्त ठरते. अंबाडी पचायला आणि शिजायला सोपी आहे. त्यामध्ये भरपूर स्टार्च असतात. हे पोट निरोगी ठेवण्यासाठी उपयुक्त आहे.
संबंधित भाजीच्या पाककृती/रेसिपी
आंबटचुका डाळभाजी
आंबटचुका / ब्लॅडर डॉकसॉरेल/ चुका
22
आंबट चुक्याची आमटी
आंबटचुका / ब्लॅडर डॉकसॉरेल/ चुका
22
हादगा फुलांची भजी
अगस्ता / हादगा / अगस्त्य
19
कुरडूची भाजी
कुरडू / कुंजर/ कुंदर
27
संबंधित भाज्या
लाल माठ / लाल भाजी / श्रावणी माठ / Red Amaranth / Blood Amaranth
Amaranthus Cruentus L.
नाळीची भाजी, नाळ
Smithia bigemina / Smithia purpurea
कुरडू / कुंजर/ कुंदर
Celosia Argentina
घोळभाजी / Benghal Deflower
Portulaca Oleracea