🌿 कोल्हापुरातील कृषी क्षेत्रातील वैभवाचे डिजिटल पोर्टल
  लॉगिन

करडईची ताकातली भाजी

साहित्य
1 करडीची जूडी निवडून धुवून बारीक कापलेली 1 टेबल स्पून बेसन फुलपात्र भरून आंबट ताक 20 लसणाच्या पाकळ्या 1/4 चमचा हळद,दीड चमचा तिखट 1 टेबलस्पून तेल चवीनुसार मीठ, थोडासा गूळ चमचा जिरं चिमूटभर हिंग
बनवण्याची पद्धत
पॅन वर ठेवून त्यामध्ये तेल टाकावे व त्यामध्ये लसूण ठेचून टाकावा व जीरे घालावे व चिमूटभर हिंग घालावे लसूण लालसर झाला की त्यामध्ये चिरलेली भाजी घालावी व छान परतावी मग त्यामध्ये मीठ गूळ हळद तिखट घालून झाकण ठेवून वाफेवर भाजी शिजू द्यावी तोपर्यंत ताकामध्ये बेसन कालवावे ते या भाजीमध्ये घालावे व भाजी छान झाकण ठेवून दहा मिनिटं शिजू द्यावी ती छान एकजीव होते व घट्ट होते गरम गरम भाजी भाताबरोबर भाकरीबरोबर चपातीबरोबर अतिशय सुंदर लागते
फायदे
पचनक्रिया सुधारते: करडईच्या भाजीमध्ये भरपूर तंतुमय पदार्थ (फायबर) असतात, जे पचनक्रिया सुधारण्यास आणि बद्धकोष्ठता (Constipation) दूर करण्यास मदत करतात. तसेच ही भाजी भूक वाढवण्याचे काम करते हिमोग्लोबिन वाढवते: या पालेभाजीमध्ये लोह (Iron) आणि व्हिटॅमिन 'ए' चे प्रमाण चांगले असते, ज्यामुळे रक्तातील हिमोग्लोबिन वाढण्यास आणि अशक्तपणा दूर होण्यास मदत होते. करडईची पाने रक्तातील विषारी घटक (Toxins) बाहेर टाकून रक्तशुद्धी करतात. त्वचेवरील डाग आणि उष्णतेमुळे होणारा दाह कमी करण्यासाठी ही उपयुक्त ठरते. सूज व सांधेदुखी कमी करते: यामध्ये असलेल्या अँटी-इन्फ्लेमेटरी (Anti-inflammatory) गुणधर्मांमुळे शरीरातील सूज, सांधेदुखी आणि पोटदुखीमध्ये आराम मिळतो हृदयाचे आरोग्य: या पानांमध्ये पोटॅशियम आणि अँटिऑक्सिडंट्स असतात, जे रक्ताभिसरण सुधारून रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास आणि हृदय निरोगी ठेवण्यास मदत करतात वात व कफ दोष कमी करते: आयुर्वेदानुसार, करडईची भाजी शरीरातील वात आणि कफ दोष संतुलित ठेवते
संबंधित भाजीच्या पाककृती/रेसिपी
झटपट अंबाड्याची भाजी
अंबाडी / Ambadi / रेड सोरेल / रोझेल
 22
कुरडूची भाजी
कुरडू / कुंजर/ कुंदर
 27
गावठी अळंबी सावजी स्टाईल
अळंबी / कुत्र्याची छत्री / सात्या / डुबरसात्या / भूछत्र /Mushroom
 27