🌿 कोल्हापुरातील कृषी क्षेत्रातील वैभवाचे डिजिटल पोर्टल
लॉगिन
कोल्हापुर कृषीवैभव
कृषी विभाग, कोल्हापूर महाराष्ट्र शासन
मुख्यपृष्ठ
आमच्याविषयी
रानभाज्या
तालुका निहाय रानभाजी
पाककृती
उत्पादक
उत्पादक नोंदणी
लेख पोस्ट करा
उत्पादक यादी
महोत्सव
लेख
संपर्क
शेंडवल भाजी
साहित्य
शेंडवल भाजी - ५ जुड्या तेल - २ ते ३ पळ्या जिरे - पाव चमचा लसूण पाकळ्या - ५ ते ६ (ठेचलेल्या) कांदा - १ मोठा (बारीक चिरलेला) चणा डाळ - २ ते ३ चमचे (पहिले भिजवून घेतलेली)हळद - पाव चमचाघाटी मसाला किंवा कांदा लसूण मसाला - १ ते १.५ चमचा मीठ - चवीनुसार ओले खोबरे - २ चमचे (किसलेले) कोथिंबीर - बारीक चिरलेली पाणी - अर्धी वाटी
बनवण्याची पद्धत
कोवळे शेंडवल देठ निवडून घ्या आणि स्वच्छ पाण्याने दोन ते तीन वेळा धुऊन बारीक चिरून घ्या. कढईत तेल गरम करा. त्यात जिरे आणि ठेचलेला लसूण घालून परतून घ्या. यात बारीक चिरलेला कांदा घाला आणि कांदा हलका गुलाबी (मऊ) होईपर्यंत परता. आता भिजवलेली चणा डाळ, हळद, घाटी मसाला (किंवा कांदा-लसूण मसाला) आणि मीठ घाला. सर्व जिन्नस चांगले एकत्र करा. चिरलेली शेंडवल भाजी कढईत टाका. वरून थोडे पाणी (अधी वाटी) शिंपडा. कढईवर झाकण ठेवून भाजी मंद आचेवर १० ते १५ मिनिटे चांगली शिजू द्या. डाळ आणि भाजी शिजली पाहिजे. भाजी शिजल्यावर त्यात ओले खोबरे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून मिक्स करा.
फायदे
शरीराची उष्णता कमी करते: ही भाजी चवीला किंचित आंबट-गोड आणि प्रकृतीने थंड असल्याने शरीरातील उष्णता कमी करण्यास अत्यंत गुणकारी ठरते. पचनक्रिया सुधारते: ही भाजी पचनासाठी अतिशय हलकी असते. पचनशक्ती वाढवून पोटात जडपणा किंवा अपचनाचा त्रास दूर करण्यास ती मदत करते. अशक्तपणा दूर करते: आजारपणात शरीराला आलेला थकवा व अशक्तपणा घालवण्यासाठी या वेलीचे कंद किंवा कोवळे शेंडे खाण्याची पारंपरिक पद्धत आहे, ज्यामुळे शरीराला ताकद मिळते. सूज कमी करण्यास उपयुक्त: या वनस्पतीचे कंद किंवा पाने बारीक करून सूजेवर बांधल्यास शरीराची सूज कमी होण्यास मदत होते. पोषक घटकांचा स्त्रोत: नैसर्गिक फायबर, जीवनसत्त्वे (Vitamins) आणि खनिजे (Minerals) यांनी समृद्ध असलेली ही रानभाजी शरीराची रोगप्रतिकारशक्ती टिकवून ठेवण्यास मदत करते.
संबंधित भाजीच्या पाककृती/रेसिपी
सुरणाची रस्सा भाजी
सुरण
26
शेंडवल भाजी
मोहोर / मंजीरी / शेंडवेल / शेंदूरवेल / मांदा / येलेरगडू / करांदी
25
आळुवडी
अळु / धोपा / टारो (Taro)
28
मायाळु भजी
पोई / पोईन / पवन / मायाळू / वावडींग / Indian spinach / Malbar spinach / Ceylon Spinach
29
संबंधित भाज्या
पोई / पोईन / पवन / मायाळू / वावडींग / Indian spinach / Malbar spinach / Ceylon Spinach
Basella alba (Green), Basella rubra (Red)
अळु / धोपा / टारो (Taro)
Colocasia esculenta
रताळे
Ipomoea batatas
मोहोर / मंजीरी / शेंडवेल / शेंदूरवेल / मांदा / येलेरगडू / करांदी
Dioscorea pentaphylla