🌿 कोल्हापुरातील कृषी क्षेत्रातील वैभवाचे डिजिटल पोर्टल
लॉगिन
कोल्हापुर कृषीवैभव
कृषी विभाग, कोल्हापूर महाराष्ट्र शासन
मुख्यपृष्ठ
आमच्याविषयी
रानभाज्या
तालुका निहाय रानभाजी
पाककृती
उत्पादक
उत्पादक नोंदणी
लेख पोस्ट करा
उत्पादक यादी
महोत्सव
लेख
संपर्क
करडईची सुकी भाजी
साहित्य
1 जुडी करड्याची भाजी 1 बारीक चिरलेला कांदा चार-पाच लसूण पाकळ्या 1 टीस्पून लाल तिखट मीठ चवीनुसार 2 टेबलस्पून शेंगदाणा कूट 1 टेबलस्पून तेल
बनवण्याची पद्धत
सर्वप्रथम कढईमध्ये तेल गरम करावे आणि त्यात कांदा परतवावा सोबतच लसणाच्या पाकळ्या ही बारीक चिरून किंवा चेचून टाकाव्यात मिरची आवडत असल्यास हिरवी मिरची घालू शकता किंवा मग लाल तिखट घालू शकता त्यानंतर करडईची भाजी बारीक चिरून घ्यावी चिरलेली कढईची भाजी कांदा ट्रान्सपरंट झाला की त्या कढईमध्ये टाकून द्यावे आणि एकदा हलवून घ्यावे आता वरून मीठ भरपूर आहे झाकण ठेवून ही भाजी पाच ते सात मिनिटे वाफ होऊ द्यावे मिठामुळे पाणी सुटते हे पाणी आटले की त्या शेंगदाण्याचे कूट घालून घ्यावे आणि एकदा भाजी छान पैकी हलवून घ्यावी तयार आहे आपली करडईची भाजी ही भाजी तुम्ही चपाती भाकरी सोबत खाऊ शकतो
फायदे
पचनक्रिया सुधारते: करडईच्या भाजीमध्ये भरपूर तंतुमय पदार्थ (फायबर) असतात, जे पचनक्रिया सुधारण्यास आणि बद्धकोष्ठता (Constipation) दूर करण्यास मदत करतात. तसेच ही भाजी भूक वाढवण्याचे काम करते हिमोग्लोबिन वाढवते: या पालेभाजीमध्ये लोह (Iron) आणि व्हिटॅमिन 'ए' चे प्रमाण चांगले असते, ज्यामुळे रक्तातील हिमोग्लोबिन वाढण्यास आणि अशक्तपणा दूर होण्यास मदत होते. करडईची पाने रक्तातील विषारी घटक (Toxins) बाहेर टाकून रक्तशुद्धी करतात. त्वचेवरील डाग आणि उष्णतेमुळे होणारा दाह कमी करण्यासाठी ही उपयुक्त ठरते. सूज व सांधेदुखी कमी करते: यामध्ये असलेल्या अँटी-इन्फ्लेमेटरी (Anti-inflammatory) गुणधर्मांमुळे शरीरातील सूज, सांधेदुखी आणि पोटदुखीमध्ये आराम मिळतो हृदयाचे आरोग्य: या पानांमध्ये पोटॅशियम आणि अँटिऑक्सिडंट्स असतात, जे रक्ताभिसरण सुधारून रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास आणि हृदय निरोगी ठेवण्यास मदत करतात वात व कफ दोष कमी करते: आयुर्वेदानुसार, करडईची भाजी शरीरातील वात आणि कफ दोष संतुलित ठेवते
संबंधित भाजीच्या पाककृती/रेसिपी
कढीपत्ता चटणी
कडीपत्ता / गोडनींब / Curry Leaves
26
मोरशेंड पानांची भाजी
मोरशेंड
43
गावठी अळंबी सावजी स्टाईल
अळंबी / कुत्र्याची छत्री / सात्या / डुबरसात्या / भूछत्र /Mushroom
28
कामोणी ची भाजी
कामोणी
29
संबंधित भाज्या
करडई पाने
Carthamus tinctorius
दिंडा / ढोलसमुद्रिका
Leea macrophylla
पीठपापडा / रानशेपू / घोरपडीचा पाला / दगडशेपू / खडकशेपू / Seri
Glossocardia bosvallea
केना / जलजंबा / Benghal Dayflower / Tropical Spiderwort
Commelina benghalensis L.