🌿 कोल्हापुरातील कृषी क्षेत्रातील वैभवाचे डिजिटल पोर्टल
लॉगिन
कोल्हापुर कृषीवैभव
कृषी विभाग, कोल्हापूर महाराष्ट्र शासन
मुख्यपृष्ठ
आमच्याविषयी
रानभाज्या
तालुका निहाय रानभाजी
पाककृती
उत्पादक
उत्पादक नोंदणी
लेख पोस्ट करा
उत्पादक यादी
महोत्सव
लेख
संपर्क
आळुवडी
साहित्य
3 मध्यम आकाराची कोवळ्या देठाची अळूची पाने 1 कप बेसन 2 टेबलस्पून तांदुळाचे पीठ 2 टेबलस्पून चिंचेचा कोळ 2 टेबलस्पून गुळ 1 टेबलस्पून लाल तिखट 1 टेबलस्पून धने पावडर 1 टेबलस्पून जिरें पावडर 1/2 टेबलस्पून हळद 1 टेबलस्पून मीठ तळण्यासाठी तेल
बनवण्याची पद्धत
अळूची पाने स्वच्छ धुऊन बारीक चिरुन घ्यावी चिरलेल्या अळूत बेसन आणि तांदुळाचे पीठ,चिंच गुळ व सर्व मसाले मीठ घालून मिक्स करून त्याचा गोळा तयार करून घ्यावा. उकड पात्राला किंवा चाळणीला तेल लावून त्यावर उकडण्यासाठी ठेवावा. दहा ते पंधरा मिनिटे उकडून घ्यावे थंड झाल्यावर एक इंचाचे तुकडे कापून तळून घ्यावेत.कुरकुरीत अळूवडी तयार.
फायदे
रक्त वाढण्यास मदत: अळूच्या पानांमध्ये लोह (Iron) आणि व्हिटॅमिन सी भरपूर असते. यामुळे शरीरातील रक्ताची कमतरता (अॅनिमिया) दूर होण्यास मदत होते. पचनक्रिया सुधारते: यामध्ये फायबर (Fiber) मोठ्या प्रमाणावर असते, ज्यामुळे पचनक्रिया सुधारते आणि बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो. रक्तदाब नियंत्रित ठेवते: अळूची पाने उच्च रक्तदाब (Blood Pressure) नियंत्रणात ठेवण्यासाठी उपयुक्त मानली जातात. डोळ्यांच्या आरोग्यासाठी चांगले: यात व्हिटॅमिन ए भरपूर प्रमाणात असल्यामुळे डोळ्यांची दृष्टी सुधारण्यास मदत होते. हाडे मजबूत होतात: अळूच्या सेवनाने हाडे मजबूत होण्यास मदत होते कारण यामध्ये कॅल्शियम आणि इतर खनिजे असतात. वजन नियंत्रित राहते: कमी कॅलरीज आणि जास्त फायबर असल्यामुळे वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत होते.
संबंधित भाजीच्या पाककृती/रेसिपी
शेंडवल भाजी
मोहोर / मंजीरी / शेंडवेल / शेंदूरवेल / मांदा / येलेरगडू / करांदी
25
सुरणाची रस्सा भाजी
सुरण
27
आळुवडी
अळु / धोपा / टारो (Taro)
29
मायाळु भजी
पोई / पोईन / पवन / मायाळू / वावडींग / Indian spinach / Malbar spinach / Ceylon Spinach
29
संबंधित भाज्या
रताळे
Ipomoea batatas
वेळू / वास्ते / काष्ठी / कळक / माणगा / Bamboo
Bambusa arundinacea (Retz.) Wild
अळु / धोपा / टारो (Taro)
Colocasia esculenta
सुरण
Amorphophallus paeoniifolius