🌿 कोल्हापुरातील कृषी क्षेत्रातील वैभवाचे डिजिटल पोर्टल
लॉगिन
कोल्हापुर कृषीवैभव
कृषी विभाग, कोल्हापूर महाराष्ट्र शासन
मुख्यपृष्ठ
आमच्याविषयी
रानभाज्या
तालुका निहाय रानभाजी
पाककृती
उत्पादक
उत्पादक नोंदणी
लेख पोस्ट करा
उत्पादक यादी
महोत्सव
लेख
संपर्क
कुयरीची कोवळ्या शेंगांची भाजी
साहित्य
कुयरीच्या कोवळ्या शेंगा (२०० ते २५० ग्रॅम), कांदा (२ मध्यम, बारीक चिरलेला), सुकं किंवा ओलं खोबरे (अर्धी वाटी किसलेले), शेंगदाण्याचा कूट (२-३ मोठे चमचे), लसूण पाकळ्या (७-८), आलं (अर्धा इंच), लाल तिखट किंवा कांदा-लसूण मसाला, हळद, जिरे-मोहरी, तेल, मीठ आणि कोथिंबीर.
बनवण्याची पद्धत
सर्वप्रथम कुयरीच्या शेंगांवर असलेले बारीक केस स्वच्छ धुऊन किंवा साफ करून घ्या, जेणेकरून खाज सुटणार नाही. शेंगांचे छोटे तुकडे करून कुकरमध्ये किंवा पातेल्यात पाणी व थोडे मीठ घालून २ ते ३ शिट्ट्या काढून शेंगा चांगल्या मऊ शिजवून घ्या (शिजवलेले पाणी फेकून द्यावे). एका कढईत थोडे तेल घालून सुकं खोबरे, लसूण, आलं आणि कांदा परतून घ्या आणि थंड झाल्यावर मिक्सरमध्ये बारीक वाटा तयार करा. कढईत तेल गरम करून मोहरी, जिरे आणि कांदा घालून सोनेरी होईपर्यंत परतून घ्या. तयार केलेले वाटण, हळद व तिखट घालून मसाला तेल सुटेपर्यंत परता. मसाल्यामध्ये उकडलेल्या शेंगांचे तुकडे, चवीनुसार मीठ व थोडे पाणी घालून भाजी ५ ते ७ मिनिटे मंद आचेवर वाफेवर शिजवून घ्या. शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून भाकरीसोबत सर्व्ह करा.
फायदे
कुयरीच्या शेंगा लोह (Iron), फायबर आणि प्रथिनांनी समृद्ध असतात. ही रानभाजी शरीराला ऊर्जा देते आणि पचनक्रिया सुधारण्यास मदत करते. आयुर्वेदानुसार या वनस्पतीच्या बिया (कवचबीज) स्नायू बळकट करण्यासाठी आणि ताकद वाढवण्यासाठी अत्यंत गुणकारी मानल्या जातात.
संबंधित भाजीच्या पाककृती/रेसिपी
चवदार आणि खमंग रान कारल्याची भाजी
करंजी / कडुली / कडवंची / रान कारले / Kakrol
29
शेवग्याच्या शेंगांची भाजी
शेवगा / मुंगना / Shevaga
22
शेंदाड / शेंदोळीची रानभाजी
वाळूक / वाळूख / शिंडे / शेंदाड / चिबडिण / वारकु / Wild Melon, Senat Seed, Small Gourd, Wild Musk Melon
22
वाघाटीच्या फळांची भाजी
कर्दुले / करटोली / काटवल / कंटोळी / रानकारली / Spine gourd
30
संबंधित भाज्या
कवठ
Limonia acidssima
मिरची
Capcicum Anum
शरणी / शिरणी / कारेटी / शिदोली / शेंदडी / Bitter cucumber / Tigger melon / Wild Melon / Small gourd
Cucumis callosus
करंजी / कडुली / कडवंची / रान कारले / Kakrol
Momordica cymbalaria