🌿 कोल्हापुरातील कृषी क्षेत्रातील वैभवाचे डिजिटल पोर्टल
  लॉगिन

कुड्याच्या फुलांची भाजी

साहित्य
4-5 टेबलस्पून तेल 1 टेबलस्पून गरम मसाला 1/2 किलो कुड्याची फुले 1 टीस्पून हळद थोडेसे खवलेले ओले खोबरे 1 टेबलस्पून मीठ आवश्‍यकतेप्रमाणे पाणी 2-3 कांदे बारीक चिरलेले
बनवण्याची पद्धत
प्रथम कुड्याची फुले व्यवस्थित साफ करून स्वच्छ धुवून घ्यावी व त्यात पाणी घालून ती गॅसवर उकळत ठेवावी फुले चांगली शिजली कि त्यातील गरम पाणी काढून पुन्हा त्यात थंड पाणी घालून ती फुले स्वच्छ धुवावी व ती पिळुन घ्यावी पिळुन घेतलेली भाजी सुरीने मोठी मोठी कापून घ्यावी, आता गॅसवर कढई ठेवून त्यात तेल ओतावे व ते गरम झाले की त्यात बारीक चिरलेला कांदा घालावा तो थोडा भाजला कि त्यात लसुन ठेचुन टाकावे व हे दोन्ही पण साहित्य चांगले भाजून घ्यावे कांदा लसूण चांगला भाजला कि त्यात लाल तिखट, हळद, मीठ व गरम मसाला घाला चांगले मिश्रण परतून घ्यावे व त्यात वरील चिरलेली फुलांची भाजी घालावी, भाजी चांगली परतून घ्यावी व त्याच्यावर झाकण ठेवून पाच ते दहा मिनिटे वाफवून द्यावी व सर्वात शेवटी ओले खोबरे घालून ती पुन्हा परतून गॅस बंद करावा तयार झाली आपली कुड्याच्या फुलांची चमचमीत भाजी
फायदे
पोटाचे विकार आणि जुलाबावर रामबाण: कुडा भाजीमध्ये अँटी-डायरिया गुणधर्म असतात. अतिसार, जुलाब (Loose motions), आणि आमांश (Dysentery) यांसारख्या पोटाच्या समस्यांवर ही भाजी अत्यंत प्रभावी मानली जाते. पचनक्रिया सुधारते: या भाजीच्या सेवनाने पचनसंस्थेचे आरोग्य उत्तम राहते. अपचन, बद्धकोष्ठता (Constipation) आणि गॅसच्या समस्या दूर होऊन अन्नपचन सहज होते. पोटातील जंत दूर करणे: लहान मुलांच्या किंवा मोठ्यांच्या पोटातील कृमी (जंत) नष्ट करण्यासाठी ही रानभाजी (कृमीनाशक म्हणून) उपयुक्त ठरते. मूळव्याध (Piles) मध्ये आराम: कुड्याच्या औषधी गुणधर्मांमुळे मूळव्याध आणि रक्तस्राव होणाऱ्या मूळव्याधीच्या त्रासापासून आराम मिळण्यास मदत होते. त्वचा विकारांवर फायदेशीर: कुडा वनस्पतीमध्ये अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात. यामुळे शरीरातील रक्त शुद्ध होण्यास आणि त्वचेचे विकार कमी होण्यास मदत होते. त्रिदोष नाशक: आयुर्वेदानुसार कुड्याची फुले आणि शेंगा शरीरातील वात, पित्त आणि कफ हे तिन्ही दोष संतुलित ठेवण्याचे काम करतात
संबंधित भाजीच्या पाककृती/रेसिपी
कुड्याच्या फुलांची भाजी
कुडा / इंद्रजव / कुटज / पांढरा कुडा / Konesi Bark Tree
 37
कपाळफोडी ची भाजी
कपाळफोडी / फोफांडा
 16
टाकळ्याची भाजी
टाकळा / तरोटा / तरवटा / Foetid Cassia
 47
कुड्याच्या फुलांची भाजी
कुडा / इंद्रजव / कुटज / पांढरा कुडा / Konesi Bark Tree
 29