🌿 कोल्हापुरातील कृषी क्षेत्रातील वैभवाचे डिजिटल पोर्टल
लॉगिन
कोल्हापुर कृषीवैभव
कृषी विभाग, कोल्हापूर महाराष्ट्र शासन
मुख्यपृष्ठ
आमच्याविषयी
रानभाज्या
तालुका निहाय रानभाजी
पाककृती
उत्पादक
उत्पादक नोंदणी
लेख पोस्ट करा
उत्पादक यादी
महोत्सव
लेख
संपर्क
मायाळु भजी
साहित्य
15 मायाळुची पाने 3/4 कप बेसन 1/4 कप तांदळाची पिठी 1/2 टीस्पून ओवा 1/2 टीस्पून तीळ 3/4 टीस्पून मीठ 1/2 टीस्पून हळद 3/4 टीस्पून तिखट मोहन व तळणासाठी तेल
बनवण्याची पद्धत
सर्वप्रथम मायाळुची पाने तोडून स्वच्छ धुवून घ्यावीत. एका भांड्यामध्ये वर दर्शवलेले साहित्य एकत्र करून मोहनाचे तेल घालुन पाण्याने भज्यांचे पीठ भिजवावे. ह्या भज्यांच्या मिश्रणामध्ये एक एक मायाळुचे पान घालुन, पानाला सगळीकडून भज्यांचे पीठ लागेल असे पहावे. गरम तेलामध्ये ही भजी तळुन घ्यावीत. हिरवी चटणी, दही किंवा सॉस सोबत सर्व्ह करावीत.
फायदे
पचनक्रिया सुधारते: मायाळूमध्ये भरपूर फायबर असते, ज्यामुळे पचनसंस्था निरोगी राहते आणि बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो. अशक्तपणा दूर होतो: यामध्ये लोह (Iron) आणि कॅल्शियमचे प्रमाण चांगले असते, जे रक्ताची कमतरता (अॅनिमिया) दूर करण्यास मदत करते. हाडे मजबूत होतात: कॅल्शियमयुक्त असल्यामुळे मायाळू हाडे आणि दांतांच्या आरोग्यासाठी खूप उपयुक्त आहे. पित्त आणि जळजळ कमी करते: मायाळूचा थंड गुणधर्म शरीरातील उष्णता, पित्त आणि अंगावर येणारी पित्ताची खाज किंवा आग कमी करण्यास मदत करतो. सांधेदुखीमध्ये आराम: याच्या पानांची भाजी खाल्ल्याने सांधेदुखीचा त्रास कमी होण्यास मदत होते. त्वचेचे विकार: अंगावर पित्त उठल्यास किंवा खाज सुटल्यास मायाळूच्या पानांचा रस अंगावर चोळल्याने आराम मिळतो. रोगप्रतिकारक शक्ती: यात विटामिन्स (A, C, K) आणि अँटिऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात, जे रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात.
संबंधित भाजीच्या पाककृती/रेसिपी
सुरणाची रस्सा भाजी
सुरण
26
शेंडवल भाजी
मोहोर / मंजीरी / शेंडवेल / शेंदूरवेल / मांदा / येलेरगडू / करांदी
24
आळुवडी
अळु / धोपा / टारो (Taro)
28
मायाळु भजी
पोई / पोईन / पवन / मायाळू / वावडींग / Indian spinach / Malbar spinach / Ceylon Spinach
29
संबंधित भाज्या
पोई / पोईन / पवन / मायाळू / वावडींग / Indian spinach / Malbar spinach / Ceylon Spinach
Basella alba (Green), Basella rubra (Red)
अळु / धोपा / टारो (Taro)
Colocasia esculenta
मोहोर / मंजीरी / शेंडवेल / शेंदूरवेल / मांदा / येलेरगडू / करांदी
Dioscorea pentaphylla
वेळू / वास्ते / काष्ठी / कळक / माणगा / Bamboo
Bambusa arundinacea (Retz.) Wild