🌿 कोल्हापुरातील कृषी क्षेत्रातील वैभवाचे डिजिटल पोर्टल
लॉगिन
कोल्हापुर कृषीवैभव
कृषी विभाग, कोल्हापूर महाराष्ट्र शासन
मुख्यपृष्ठ
आमच्याविषयी
रानभाज्या
तालुका निहाय रानभाजी
पाककृती
उत्पादक
उत्पादक नोंदणी
लेख पोस्ट करा
उत्पादक यादी
महोत्सव
लेख
संपर्क
आघाडची भाजी
साहित्य
आघाड्याची कोवळी पाने लसून कांदा डाळीचे पीठ तेल तिखट मीठ फोडणीचे साहित्य
बनवण्याची पद्धत
आघाड्याची पाने धुवून, चिरुन घ्यावीत. कढईत तेल घेऊन त्यात फोडणी करुन घ्यावी. लसणाच्या पाकळ्या घालाव्यात. नंतर चिरलेली भाजी, तिखट, मीठ घालुन चांगली वाफ येऊ द्यावी. भाजी अर्धवट शिजल्यावर डाळीचे पीठ हळुहळु भुरभुरत टाकावे. सतत भाजी हलवावी. एकसारखे हलवत राहिल्याने भाजी मोकळी होईल. भाजी मंद गॅसवर शिजवून घ्यावी.
फायदे
पचन सुधारते: आघाड्याची भाजी पाचक आहे. जेवणानंतर ही भाजी घेतल्यास पोटातील आम्लता (Acidity) कमी होते, तर जेवणापूर्वी घेतल्याने पाचकरस वाढून भूक सुधारते. पोट साफ करते: बद्धकोष्ठतेचा त्रास असल्यास किंवा लघवी साफ होत नसल्यास ही भाजी अत्यंत गुणकारी ठरते. मुतखडा आणि मूत्रविकार: या वनस्पतीमुळे लघवीची आम्लता कमी होते आणि मुतखडा (Kidney Stone) तसेच मूत्रनलिकेचा दाह कमी होण्यास मदत होते. मूळव्याध आराम: मूळव्याधीच्या तक्रारींमध्ये, गुदभागी होणाऱ्या वेदना आणि खाज कमी करण्यासाठी आघाड्याची भाजी उपयुक्त ठरते. वजन आणि मेद नियंत्रण: शरीरातील अतिरिक्त चरबी किंवा मेद कमी करण्यासाठी आघाड्याची कोरडी भाजी फायदेशीर मानली जाते. हाडे बळकट होतात: या रानभाजीच्या नियमित सेवनाने हाडे मजबूत होण्यास मदत होते. दातदुखीसाठी उपयुक्त: आघाड्याच्या काड्या किंवा पानांचा रस दातांना व हिरड्यांना लावल्यास दातदुखी व हिरड्यांची सूज कमी होते.
संबंधित भाजीच्या पाककृती/रेसिपी
आंबुटी ची भाजी
आंबुटी / आंबाती आंबटी / भुईपर्पटी / चांगेरी / Indian Sorrel
22
भुई आवळा भाजी
भुईआवळी / भुई आवळा
20
कामोणी ची भाजी
कामोणी
29
मटारु भाजी
करांदा / मटारू / गठालू / वाराही कंद / Bulb Bearing Yam
18
संबंधित भाज्या
रानघोळ, भुईचौली, खाटेचौनाळ, चिवळी, लहान घोळ व छोटी घोळ
Portulaca quadrifida
मोरशेंड
Bidens biternata
आंबुटी / आंबाती आंबटी / भुईपर्पटी / चांगेरी / Indian Sorrel
Oxalis Corniculata
पिंपळ भाजी / Piple
Ficus religiosa