🌿 कोल्हापुरातील कृषी क्षेत्रातील वैभवाचे डिजिटल पोर्टल
  लॉगिन

पातुर ची भाजी

साहित्य
पाथरीची चिरलेली भाजी ताक मीठ हिरवी मिरची लाल मिरची साखर चणाडाळ शेंगदाणे बेसन तेल मेथी मोहरी हिंग हळद जिरे
बनवण्याची पद्धत
पाथरीची चिरलेली भाजी उकडून घ्यावी व पाणी टाकून द्यावे. डाळ, दाणे, भिजवून तासाभराने दाणे, डाळ वेगवेगळे शिजवावे. पाथरीची भाजी शिजवून घ्यावी. तेव्हाच मीठ, साखर, बेसन व ताक घालुन एकजीव करावे. डाळ, दाणे घालावे. फोडणीत दोन्ही मिरच्या व इतर साहित्य घालुन त्यात एकजीव केलेली भाजी ओतावी व ढवळत राहून उकळावे. ताकाऐवजी चिंचेचा कोळ व गुळ घालुनही भाजी करता येईल.
फायदे
पचनक्रिया सुधारते: या पालेभाजीत भरपूर फायबर असते, ज्यामुळे गॅस, बद्धकोष्ठता (Constipation) यांसारख्या पोटाच्या समस्या दूर होतात. प्रतिकारशक्ती वाढते: नैसर्गिक वातावरणात उगवत असल्याने या भाजीमध्ये जीवनसत्त्वे आणि खनिजे मुबलक प्रमाणात असतात, जी शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करतात. कमी उष्मांक (Low Calories): वजन नियंत्रित ठेवू इच्छिणाऱ्यांसाठी ही भाजी उत्तम पर्याय आहे.
संबंधित भाजीच्या पाककृती/रेसिपी
भुई आवळा भाजी
भुईआवळी / भुई आवळा
 20
हादगा फुलांची भजी
अगस्ता / हादगा / अगस्त्य
 19
आघाडची भाजी
आघाडा
 42
वायवर्णाची भाजी
वरुण / हाडवर्णा / वायवर्णा
 42