🌿 कोल्हापुरातील कृषी क्षेत्रातील वैभवाचे डिजिटल पोर्टल
लॉगिन
कोल्हापुर कृषीवैभव
कृषी विभाग, कोल्हापूर महाराष्ट्र शासन
मुख्यपृष्ठ
आमच्याविषयी
रानभाज्या
तालुका निहाय रानभाजी
पाककृती
उत्पादक
उत्पादक नोंदणी
लेख पोस्ट करा
उत्पादक यादी
महोत्सव
लेख
संपर्क
चवदार आणि खमंग रान कारल्याची भाजी
साहित्य
रान कारले / करंजी (कडवंची) - २५० ग्रॅम (धुऊन, दोन्ही टोके कापून उभ्या किंवा गोल चकत्या करून घेतलेल्या), कांदा - २ मोठे (बारीक चिरलेले), शेंगदाण्याचा कूट - अर्धी वाटी, बेसन (हरभरा डाळीचे पीठ) - २ मोठे चमचे (पर्यायी, भाजीला छान बाइंडिंग येण्यासाठी), लसूण - ८ ते १० पाकळ्या (ठेचलेल्या), हिरव्या मिरच्या - ३-४ किंवा लाल तिखट / कांदा-लसूण मसाला - आवडीनुसार, हळद - पाव चमचा, जिरे आणि मोहरी - फोडणीसाठी, तेल - ३ मोठे चमचे, मीठ - चवीनुसार, कोथिंबीर - बारीक चिरलेली
बनवण्याची पद्धत
रान कारल्याचे (करंजी) पाणी २ वेळा स्वच्छ धुऊन घ्या. आवडीनुसार त्याचे गोल किंवा उभे पातळ काप करून घ्या (काहीजण आतील बिया कडक असल्यास काढून टाकतात, कोवळ्या बिया चालतात). कढईत तेल गरम करून त्यात जिरे, मोहरी आणि ठेचलेला लसूण घालून खमंग फोडणी करा. त्यात बारीक चिरलेला कांदा घालून तो हलका गुलाबी होईपर्यंत परतून घ्या. त्यानंतर चिरलेली करंजी (रान कारले) फोडणीत टाका आणि ५ मिनिटे तेलावर चांगली परतून घ्या जेणेकरून त्याचा कच्चेपणा निघून जाईल. आता त्यात हळद, लाल तिखट (किंवा कांदा-लसूण मसाला) आणि चवीनुसार मीठ घालून सर्वकाही नीट एकत्र करा. भाजीमध्ये शेंगदाण्याचा कूट आणि बेसन पीठ घालून मिक्स करा. कढईवर झाकण ठेवून मंद आचेवर भाजी वाफेवर शिजू द्या (गरज असल्यास पाण्याचा हडका मारा). भाजी मऊ झाल्यावर गॅस बंद करा. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर भुरभुरा; चवदार आणि खमंग रान कारल्याची भाजी तयार आहे.
फायदे
रक्तातील साखरेवर नियंत्रण: रान कारल्यामध्ये मधुमेह (Diabetes) नियंत्रणात ठेवण्याचे नैसर्गिक गुणधर्म असतात. पचनक्रिया सुधारते: यात फायबरचे प्रमाण भरपूर असल्याने पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. अँटिऑक्सिडंट्स: यामध्ये भरपूर प्रमाणात अँटिऑक्सिडंट्स आणि क जीवनसत्त्व असते, जे प्रतिकारशक्ती (Immunity) वाढवण्यासाठी उपयुक्त ठरते.
संबंधित भाजीच्या पाककृती/रेसिपी
चवदार आणि खमंग रान कारल्याची भाजी
करंजी / कडुली / कडवंची / रान कारले / Kakrol
30
उंबराची मसालेदार भाजी
उंबर / औदुम्बर / हेमदुग्ध
30
वाघाटीच्या फळांची भाजी
कर्दुले / करटोली / काटवल / कंटोळी / रानकारली / Spine gourd
30
शेंदाड / शेंदोळीची रानभाजी
वाळूक / वाळूख / शिंडे / शेंदाड / चिबडिण / वारकु / Wild Melon, Senat Seed, Small Gourd, Wild Musk Melon
22
संबंधित भाज्या
करंजी / कडुली / कडवंची / रान कारले / Kakrol
Momordica cymbalaria
मिरची
Capcicum Anum
उंबर / औदुम्बर / हेमदुग्ध
Ficus recemosa
शरणी / शिरणी / कारेटी / शिदोली / शेंदडी / Bitter cucumber / Tigger melon / Wild Melon / Small gourd
Cucumis callosus