🌿 कोल्हापुरातील कृषी क्षेत्रातील वैभवाचे डिजिटल पोर्टल
लॉगिन
कोल्हापुर कृषीवैभव
कृषी विभाग, कोल्हापूर महाराष्ट्र शासन
मुख्यपृष्ठ
आमच्याविषयी
रानभाज्या
तालुका निहाय रानभाजी
पाककृती
उत्पादक
उत्पादक नोंदणी
लेख पोस्ट करा
उत्पादक यादी
महोत्सव
लेख
संपर्क
गावठी अळंबी सावजी स्टाईल
साहित्य
750 ग्रॅम गावठी आळंबी 200 ग्रॅम कांदे 1 टेबल स्पून आलेलसूण पेस्ट 1 कप तेल 1 टेबल स्पून लाल तिखट 1/2 टी स्पून हळद 2 टी स्पून सावजी मसाला 2 टी स्पून मीठ 1 टी स्पून कोथिंबीर चिरलेली
बनवण्याची पद्धत
सर्वप्रथम आळंबी चार-पाच पाण्यामध्ये स्वच्छ धुऊन घ्यावी, व बारीक चिरून ठेवावी.तसेच कांदा सुद्धा बारीक चिरुन तयार ठेवावा.आता कढईमध्ये जवस तेल गरम करायला ठेवून कांदा घालून परतावा,कांदा सोनेरी होत आला की आलेलसूण पेस्ट घालून पुन्हा छान परतावे. कढईतले आले लसणासोबत चे मिश्रण खमंग परतल्यावर त्यामध्ये तिखट व हळद ॲड करून थोडेसे हलवून चिरलेली आळंबी ऍड करावी.व परतत तेलावरच भरपुर होऊ द्यावी. थोडावेळ झाकण ठेवून वाफेवर शिजू द्यावे. 80% वाफेवर शिजलेली अळंबी मध्ये आता सावजी मसाला,मीठ व गरजेइतकेच पाणी घालून दोन-तीन उकळ्या येऊ द्याव्यात. गॅस बंद करुन चिरलेली कोथिंबीर भाजीवर पसरवावी, झणझणीत सावजी आळंबी तयार आहे.
फायदे
रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी फायदेशीर ठरते. अतिरिक्त ऊर्जा शक्तीचा स्रोत लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत सर्वांनी अळिंबीचे सेवन केले पाहिजे. अळिंबीतील प्रथिनांमध्ये शरीरास पोषक आणि आवश्यक अमिनो आम्लांचा समावेश आहे. ही भाजीपाल्यातील प्रथिनांपेक्षा उच्च प्रतीची व पचनास हलकी असतात. अमिनो आम्लापैकी ट्रिप्टोफॅन, लायसिन मोठ्या प्रमाणात असतात. जीवनसत्त्व ब-१, ब-२ व क यांचे प्रमाणही इतर अन्न घटकांपेक्षा जास्त आहे. ही जीवनसत्त्वे आरोग्यासाठी फायदेशीर असतात. उदा. अशक्तपणापासून बचाव, गर्भवती माता आणि तिच्या बाळासाठी फायदेशीर, कोलेस्ट्रॉल नियंत्रित करण्यासाठी आणि त्वचेचे आरोग्य सुधारण्यासाठी उपयुक्त असतात.
संबंधित भाजीच्या पाककृती/रेसिपी
मोरशेंड पानांची भाजी
मोरशेंड
42
झटपट अंबाड्याची भाजी
अंबाडी / Ambadi / रेड सोरेल / रोझेल
22
दिंड्याची भाजी
दिंडा / ढोलसमुद्रिका
18
अंबाडीची भाजी
अंबाडी / Ambadi / रेड सोरेल / रोझेल
24
संबंधित भाज्या
मोरशेंड
Bidens biternata
चाकवत / बटुआ
Chenopodium album
कुरडू (सफेदमुर्गा)
Celosia argentea
भारंगी / भारंग
Clerodendrum serratum