🌿 कोल्हापुरातील कृषी क्षेत्रातील वैभवाचे डिजिटल पोर्टल
  लॉगिन

कढीपत्ता चटणी

साहित्य
1 चमचे तेल 1 वाटी कढीपत्ता 2 चमचे डाळा 2 चमचे शेंगदाणे 1 चमचे लाल तिखट 2 चिमूट साखर 1 चमचे जीरे मीठ चवीनुसार
बनवण्याची पद्धत
1 चमचा तेलात कढीपत्ता बारिक गैसवर भाजुन घ्या करपनार नाही याची काळजी घ्या डाळा,शेंगदाणे भाजुन घ्या. आता मीक्सर ला शेंगदाणे,डाळा,लाल तिखट,मीठ, साखर,जीरे वाटून घ्या आणी नंतर भाजलेला कढीपत्ता टाका आणी पुन्हा एकदा मीक्सर फिरवून घ्या. कढीपत्ता चटणी तयार. तयार चटणी डाळभात/इडली/दोसा या सोबत खा मस्त लागते
फायदे
पचनक्रिया सुधारते: सकाळी रिकाम्या पोटी कढीपत्ता खाल्ल्याने पचनयंत्रणा मजबूत होते आणि बद्धकोष्ठता व ॲसिडिटीपासून आराम मिळतो. केसांचे आरोग्य: कढीपत्त्यातील पोषक घटकांमुळे केसांची वाढ चांगली होते आणि केस मजबूत होतात. मधुमेह नियंत्रण: या पानांमुळे रक्तातील साखरेची (Blood Sugar) पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत होते. रक्ताची कमतरता दूर होते: कढीपत्त्यात लोह (Iron) आणि फॉलिक ॲसिड असते, जे ॲनिमियाचा त्रास कमी करण्यास उपयुक्त ठरते. कोलेस्ट्रॉल कमी होते: यातील अँटिऑक्सिडंट्समुळे खराब कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते.
संबंधित भाजीच्या पाककृती/रेसिपी
ओवा पानांची भाजी
पानांचा ओवा / पाथरचूर
 27
अंबाडीची भाजी
अंबाडी / Ambadi / रेड सोरेल / रोझेल
 24
चिवळ भाजी
रानघोळ, भुईचौली, खाटेचौनाळ, चिवळी, लहान घोळ व छोटी घोळ
 35
नाळीची भाजी
नाळीची भाजी, नाळ
 16