🌿 कोल्हापुरातील कृषी क्षेत्रातील वैभवाचे डिजिटल पोर्टल
  लॉगिन

झटपट अंबाड्याची भाजी

साहित्य
1 जुडी अंबाड्याची पान 1/4 वाटी तांदूळ पाव वाटी चणाडाळ पाव वाटी दाणे 12 लसणाच्या पाकळ्या,2 लाल मिरच्या 1/4 चमचा हळद, दीड चमचा तिखट 1 टेबलस्पून तेल चिमूटभर हिंग,अर्धा चमचा जीरे चवीनुसार मीठ,सुपारी एवढा गुळ
बनवण्याची पद्धत
अंबाड्याची पानं स्वच्छ धुवावीत,डाळ तांदूळ शेंगदाणे पण स्वच्छ धुवावेत कुकरच्या एका भांड्यामध्ये अंबाड्याची पानं थोडं पाणी व दुसऱ्या भांड्यामध्ये तांदूळ शेंगदाणे व डाळ आणि पाणी असं घालून कुकरच्या तीन शिट्ट्या कराव्या व कुकर थंड होऊ द्यावा मग अंबाड्याची पानं चाळणीवर निथळत ठेवावी कढई गॅसवर ठेवावी ती गरम झालीकी त्यामध्ये ठेचलेला लसूण लाल मिरची जीर हिंग घालून छान परतावं लसूण लाल झाला की त्यामध्ये हळद तिखट मीठ गूळ घालून छान परतावं मग त्यामध्ये शिजलेले डाळ तांदूळ व दाणे घालावेत व अंबाड्याची पानं घालावी व चमच्याने छान हाटून घ्यावे व मंद गॅसवर पाच ते दहा मिनिटे उकळत ठेवावे गॅस बंद करावा गरम गरम चपाती भाकरी भाताबरोबर आपण ही भाजी खाऊ शकतो
फायदे
हृदय निरोगी ठेवण्यासाठी फायदेशीर आहे. उच्च रक्तदाब कमी करण्यास मदत करते. खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यास फायदेशीर आहे. वजन कमी करण्यासाठी आरोग्यदायी पर्याय आहे. यामध्ये कॅलरी कमी असतात. भरपूर जीवनसत्त्वे आणि तंतुमय घटक असतात. जीवनसत्त्व अ, लोह, झिंक मुबलक प्रमाणात असल्याने डोळ्यांच्या आरोग्यासाठी उपयुक्त. यामध्ये जीवनसत्त्वे आणि प्रथिने भरपूर प्रमाणात आहेत. केस मजबूत आणि निरोगी होतात. केस गळणे किंवा सहजपणे तुटणे टाळता येते. यामध्ये कॅल्शिअम असल्याने हाडे मजबूत करण्यास मदत करते. ऑस्टियोपोरोसिस आजारापासून संरक्षण मिळते. लोहाचे प्रमाण जास्त असल्याने हिमोग्लोबिन वाढविण्यासाठी फायदेशीर आहे. रक्तल्पता किंवा ॲनिमिया आजार असणाऱ्यांनी दैनंदिन आहारामध्ये अंबाडी भाजीचा समावेश करावा. अंबाडीमध्ये डाययुरेटिक गुण असल्याने लघवीला जळजळ होणे, उन्हाळे लागणे यावर ही भाजी उपयुक्त ठरते. अंबाडी पचायला आणि शिजायला सोपी आहे. त्यामध्ये भरपूर स्टार्च असतात. हे पोट निरोगी ठेवण्यासाठी उपयुक्त आहे.
संबंधित भाजीच्या पाककृती/रेसिपी
आंबटचुका डाळभाजी
आंबटचुका / ब्लॅडर डॉकसॉरेल/ चुका
 21
खापरखुटी ची भाजी
खापरखुटी / पुनर्नवा
 26
करडई भाजी
करडई पाने
 21