🌿 कोल्हापुरातील कृषी क्षेत्रातील वैभवाचे डिजिटल पोर्टल
  लॉगिन

सुरणाची रस्सा भाजी

साहित्य
1/4 किलो सुरण 2 कांदे, दोन टोमॅटो पाच-सहा लसुन,एक इंच आलं चमचा हळद,दीड चमचा तिखट, एक चमचा गरम मसाला 1 टेबल स्पून तेल 1/2 चमचा मोहरी,पाव चमचा,चिमूटभर हिंग चवीनुसार मीठ, सुपारीएवढा गूळ थोडीशी कोथंबीर
बनवण्याची पद्धत
सुरणाची सालं काढून धून बारीक कापून फोडी करून घ्यावा,कांदा टोमॅटोही बारीक कापावा, लसूण बारीक ठेचून घ्यावा, कोथिंबीर धुऊन बारीक कापून घ्यावी भाजीचा कुकर गॅसवर ठेवून तो गरम झाला की त्यामध्ये तेल घालावं तेल गरम झाले की मोहरी, जीरे याची खमंग फोडणी करून त्यामध्ये कांदा टोमॅटो वआलं लसूण ठेचलेला घालून छान परता यामध्ये हळद,तिखट, मसाला, मीठ गूळ घालून छान परताव मग त्यामध्ये पाणी घालून कुकर च्या एक किंवा दोन शिट्या करून कुकर थंड झाला की त्यावर कोथिंबीर घाकून गरम गरम चपाती बरोबर खावे अतिशय सोपी व चविष्ट अशी भाजी तयार होते.
फायदे
पचनक्रिया सुधारते: सुरणात फायबर असते. त्यामुळे बद्धकोष्ठता (कोष्टबद्धता) दूर होते आणि पोट साफ राहते. गॅस व अपचनावरही हा चांगला उपाय आहे. रक्तदाब नियंत्रित ठेवतो: यात पोटॅशियम आणि मॅग्नेशियम असते. यामुळे रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहून हृदय निरोगी राहते. मधुमेहासाठी फायदेशीर: सुरणाचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो. त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत होते. वजन नियंत्रणात ठेवते: सुरण खाल्ल्यावर लवकर पोट भरल्यासारखे वाटते. यामुळे वारंवार खाण्याची सवय सुटते व वजन कमी करण्यास मदत होते. रोगप्रतिकारशक्ती वाढवते: यामध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटिऑक्सिडंट्स असतात. त्यामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते आणि सर्दी-खोकल्यापासून बचाव होतो. त्वचेचे आरोग्य: सुरण रक्तशुद्धीकारक मानला जातो. यामुळे त्वचेवरील पुरळ व इतर समस्या कमी होण्यास मदत होते.
संबंधित भाजीच्या पाककृती/रेसिपी
शेंडवल भाजी
मोहोर / मंजीरी / शेंडवेल / शेंदूरवेल / मांदा / येलेरगडू / करांदी
 25
मायाळु भजी
पोई / पोईन / पवन / मायाळू / वावडींग / Indian spinach / Malbar spinach / Ceylon Spinach
 29
आळुवडी
अळु / धोपा / टारो (Taro)
 28