🌿 कोल्हापुरातील कृषी क्षेत्रातील वैभवाचे डिजिटल पोर्टल
  लॉगिन

कपाळफोडी ची भाजी

साहित्य
कपाळफोडीची पाने तेल बारीक चिरलेला कांदा मिरची लसुन जिरा तिखट मीठ हळद टमाटर कोथींबीर
बनवण्याची पद्धत
कपाळफोडीची पाने स्वच्छ धुऊन चिरुन घ्यावीत. एक पातेले घेऊन त्यात एक ग्लास पाणी व चिरलेली भाजी उकळुन घ्यावी. नंतर त्यातील पाणी नितळुन घ्यावे. नंतर एक पातेले घेऊन त्यात आपल्याला पाहिजे तेवढे तेल, गरम करुन त्यात बारीक चिरलेला कांदा, मिरची, लसुन, जिरा, तिखट, मीठ, हळद, टमाटर तळून घ्यावे. नंतर त्यामध्ये भाजी टाकुन मंद गॅसवर शिजु द्यावे. नंतर कोथींबीर टाकावे. अशा प्रकारे आपल्या आवडीची भाजी तयार होईल.
फायदे
कानदुखीवर गुणकारी: कपाळफोडीच्या पानांचा रस किंवा पंचांगाचा लेप कानात टाकल्यास कानदुखी आणि कानफुटीचा त्रास थांबतो. सांधेदुखी व सूज कमी करते: सांधेसुजीवर हिची पाने व मूळ पाण्यात किंवा दुधात वाटून लेپ केल्यास वेदना आणि सूज कमी होते. केसांच्या आरोग्यासाठी: हिच्या पानांचा वापर केस संवर्धनासाठी आणि कोंडा कमी करण्यासाठी केला जातो. त्वचारोग: इसब (Eczema) व इतर त्वचेच्या विकारांवर ही वनस्पती उपयुक्त मानली जाते.
संबंधित भाजीच्या पाककृती/रेसिपी
कुड्याच्या फुलांची भाजी
कुडा / इंद्रजव / कुटज / पांढरा कुडा / Konesi Bark Tree
 36
टाकळा रानभाजी
टाकळा / तरोटा / तरवटा / Foetid Cassia
 33
टाकळ्याची भाजी
टाकळा / तरोटा / तरवटा / Foetid Cassia
 47
कुड्याच्या फुलांची भाजी
कुडा / इंद्रजव / कुटज / पांढरा कुडा / Konesi Bark Tree
 28