🌿 कोल्हापुरातील कृषी क्षेत्रातील वैभवाचे डिजिटल पोर्टल
लॉगिन
कोल्हापुर कृषीवैभव
कृषी विभाग, कोल्हापूर महाराष्ट्र शासन
मुख्यपृष्ठ
आमच्याविषयी
रानभाज्या
तालुका निहाय रानभाजी
पाककृती
उत्पादक
उत्पादक नोंदणी
लेख पोस्ट करा
उत्पादक यादी
महोत्सव
लेख
संपर्क
ओवा पानांची भाजी
साहित्य
पानांचा ओवा या वनस्पतीची पाने बारीक चिरलेला कांदा चिरलेल्या मिरच्या लसूण पाकळ्या तेल मोहरी मीठ हळद
बनवण्याची पद्धत
पाने स्वच्छ धुवून घ्यावीत. देठे काढून टाकावीत. पाने बारीक चिरून घ्यावीत. कढईत तेल गरम करून फोडणी द्यावी. त्यात चिरलेला कांदा, मिरच्या घालून परतावे. नंतर चिरलेली पाने घालून परतावे. झाकण घालून वाफेवर शिजवावे. भाजी पुन्हा एकदा ढवळावी व तयार झालेली भाजी गरमच वाढावी.
फायदे
सर्दी आणि खोकला दूर होतो: ओव्याच्या पानांमध्ये अँटीबॅक्टेरियल आणि अँटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्म असतात, जे सर्दी, खोकला व घशातील खवखव कमी करण्यास मदत करतात पचनक्रिया सुधारते: ओव्याचे पान चावून खाल्ल्याने किंवा त्याचा काढा घेतल्याने पोटातील जळजळ कमी होते आणि अपचन, गॅस व पोटफुगीचा त्रास दूर होतो. शरीर डिटॉक्स होते: ओव्याची पाने नैसर्गिक डिटॉक्स म्हणून काम करतात. तुळशीच्या पानांसोबत ओव्याच्या पानांचा काढा करून त्यात लिंबाचा रस मिसळून प्यायल्यास शरीर डिटॉक्स होते. श्वसनाच्या त्रासात आराम: छातीत कफ साचला असल्यास ओव्याची पाने पाण्यात उकळून त्याची वाफ घेतल्यास कफ मोकळा होतो आणि दमा किंवा ब्राँकायटिसच्या त्रासात आराम मिळतो. रोगप्रतिकारक शक्ती वाढते: या पानांमधील अँटीऑक्सिडंट्स शरीराची रोगप्रतिकारक शक्ती (Immunity) मजबूत करतात.
संबंधित भाजीच्या पाककृती/रेसिपी
खापरखुटी ची भाजी
खापरखुटी / पुनर्नवा
26
वायवर्णाची भाजी
वरुण / हाडवर्णा / वायवर्णा
41
दिंड्याची भाजी
दिंडा / ढोलसमुद्रिका
17
करडईची ताकातली भाजी
करडई पाने
20
संबंधित भाज्या
खापरखुटी / पुनर्नवा
Boerthavia diffusa
भारंगी / भारंग
Clerodendrum serratum
नाळीची भाजी, नाळ
Smithia bigemina / Smithia purpurea
चवळी / CHAVALI
Amaranthus viridis