🌿 कोल्हापुरातील कृषी क्षेत्रातील वैभवाचे डिजिटल पोर्टल
  लॉगिन

खापरखुटी ची भाजी

साहित्य
खापरखुटी ची भाजी तेल बारीक चिरलेला कांदा मिरची लसुन जिरा तिखट मीठ हळद टमाटर कोथींबीर
बनवण्याची पद्धत
सर्वप्रथम खपरखुटीची खुडलेली भाजी धुवुन घ्यावे. नंतर एक पातेले घेउन त्यात आपल्याला पाहिजे तेवढे तेल, गरम करुन त्यात बारीक चिरलेला कांदा, मिरची, लसुन, जिरा, तिखट, मीठ, हळद, टमाटर तळून घ्यावे. नंतर त्यामध्ये भाजी टाकुन शिजु द्यावे. नंतर कोथींबीर टाकावे. अशा प्रकारे आपल्या आवडीची भाजी तयार होईल.
फायदे
किडनीसाठी उपयुक्त: ही भाजी व वनस्पती मुतखडा (Kidney Stone) आणि किडनीच्या विविध विकारांवर गुणकारी आहे. किडनीची सूज कमी करण्यास ही मदत करते. यकृताचे आरोग्य (Liver): यकृताचे कार्य सुधारण्यासाठी आणि लिव्हरला संरक्षण देण्यासाठी ही भाजी उत्तम मानली जाते. सूज आणि जळजळ कमी करते: शरीरावरील सूज तसेच लघवीची जळजळ कमी करण्यासाठी ही फायदेशीर ठरते. वात व कफ दोष कमी करते: ही भाजी वातहर आणि कफघ्न आहे. शरीरातील वात कमी करते आणि खोकला व दमा यांसारख्या विकारांमध्ये आराम देते. शरीर डिटॉक्स करते: शरीरातील विषारी घटक बाहेर टाकून शरीर शुद्ध ठेवण्यास ही मदत करते.
संबंधित भाजीच्या पाककृती/रेसिपी
वायवर्णाची भाजी
वरुण / हाडवर्णा / वायवर्णा
 41
कामोणी ची भाजी
कामोणी
 29
आघाडची भाजी
आघाडा
 41