🌿 कोल्हापुरातील कृषी क्षेत्रातील वैभवाचे डिजिटल पोर्टल
  लॉगिन

हादगा फुलांची भजी

साहित्य
२ वाटी बेसन २ चमचे तांदूळ पीठ १ चमचा तिखट १/२ चमचा हळद १ चमचा तीळ १/२ चमचा ओवा १ चमचा मीठ चवीप्रमाणे २५० ग्रॅम हादगा फुले
बनवण्याची पद्धत
प्रथम फुलातील तुरे काढून निवडून धुवून घ्यावी व निथळत ठेवावी बेसनात तांदूळ पीठ,तिखट,मीठ,हळद,ओवा घालून कोमट पाण्याने भज्जी ला भिजवतो तसे भिजवावे व १०मिनिटे झाकून ठेवावे आता तेल मध्यम आचेवर तापवून फुले भज्जी पिठात १-१ घोळवून तेलात सोडावे पलटी केल्यावर मंद गॅसवर कुरकुरीत तळावी गरमागरम ब्रेकफास्ट तयार सॉस बरोबर सर्व्ह करावी
फायदे
दोष संतुलन: हादग्याची फुले, पाने आणि शेंगा खाल्ल्याने शरीरातील वात, कफ आणि पित्त हे तीनही दोष संतुलित राहण्यास मदत होते सर्दी व डोकेदुखी: सर्दी, पडसे किंवा दाटून आलेले नाक आणि डोकेदुखीवर अगस्त्याच्या पानांचा रस उपयुक्त मानला जातो डोळ्यांचे आरोग्य: ही भाजी डोळ्यांच्या आरोग्यासाठी (नेत्रविकारांवर) फायदेशीर आहे. पोटाचे विकार: पोटाचे विविध विकार आणि पोटदुखीवर ही गुणकारी ठरते. मात्र, हिचे अतिसेवन टाळावे, कारण जास्त खाल्ल्यास पोटाचा त्रास होऊ शकतो चव आणि पौष्टिक ताकद: याची फुले चवीला हलकी कडवट व थंड प्रकृतीची असतात. याची भाजी किंवा भजी अत्यंत स्वादिष्ट आणि पौष्टिक असतात
संबंधित भाजीच्या पाककृती/रेसिपी
आंबटचुका डाळभाजी
आंबटचुका / ब्लॅडर डॉकसॉरेल/ चुका
 22
कढीपत्ता चटणी
कडीपत्ता / गोडनींब / Curry Leaves
 26
झटपट अंबाड्याची भाजी
अंबाडी / Ambadi / रेड सोरेल / रोझेल
 22
मटारु भाजी
करांदा / मटारू / गठालू / वाराही कंद / Bulb Bearing Yam
 19
संबंधित भाज्या
नाळीची भाजी, नाळ
Smithia bigemina / Smithia purpurea
भारंगी / भारंग
Clerodendrum serratum
कामोणी
Solanum Nigrum