🌿 कोल्हापुरातील कृषी क्षेत्रातील वैभवाचे डिजिटल पोर्टल
  लॉगिन

उंबराची मसालेदार भाजी

साहित्य
उंबराची कोवळी फळे – 250 ग्रॅम कांदा – 1 मध्यम लसूण – 5 ते 6 पाकळ्या हिरवी मिरची – 2 शेंगदाण्याचा कूट – 2 चमचे खोबरे – 2 चमचे तेल – 2 चमचे मोहरी – ½ चमचा जिरे – ½ चमचा हळद – ¼ चमचा लाल तिखट – 1 चमचा धणेपूड – ½ चमचा मीठ – चवीनुसार कोथिंबीर – थोडी
बनवण्याची पद्धत
उंबराची कोवळी फळे स्वच्छ धुऊन त्यांचे छोटे तुकडे करावेत. कढईमध्ये तेल गरम करून मोहरी व जिऱ्याची फोडणी द्यावी. त्यामध्ये चिरलेला कांदा, लसूण व हिरवी मिरची घालून कांदा मऊ होईपर्यंत परतावा. त्यात हळद, लाल तिखट व धणेपूड घालावी. त्यानंतर चिरलेला उंबर घालून व्यवस्थित परतावा. थोडे पाणी घालून झाकण ठेवावे व मंद आचेवर उंबर शिजू द्यावा. उंबर शिजल्यानंतर शेंगदाण्याचा कूट व खोबरे घालून चांगले मिसळावे. आवश्यकतेनुसार मीठ घालून 2-3 मिनिटे परतावे. शेवटी कोथिंबीर घालून गरमागरम भाजी सर्व्ह करावी.
फायदे
उंबर ही पारंपरिक रानभाजी असून ग्रामीण व स्थानिक आहारपद्धतीमध्ये तिचा उपयोग केला जातो. उंबराच्या कोवळ्या फळांपासून भाजी तसेच इतर पारंपरिक पदार्थ तयार केले जातात.
संबंधित भाजीच्या पाककृती/रेसिपी
शेंदाड / शेंदोळीची रानभाजी
वाळूक / वाळूख / शिंडे / शेंदाड / चिबडिण / वारकु / Wild Melon, Senat Seed, Small Gourd, Wild Musk Melon
 22
उंबराची मसालेदार भाजी
उंबर / औदुम्बर / हेमदुग्ध
 31
वाघाटीच्या फळांची भाजी
कर्दुले / करटोली / काटवल / कंटोळी / रानकारली / Spine gourd
 30