🌿 कोल्हापुरातील कृषी क्षेत्रातील वैभवाचे डिजिटल पोर्टल
लॉगिन
कोल्हापुर कृषीवैभव
कृषी विभाग, कोल्हापूर महाराष्ट्र शासन
मुख्यपृष्ठ
आमच्याविषयी
रानभाज्या
तालुका निहाय रानभाजी
पाककृती
उत्पादक
उत्पादक नोंदणी
लेख पोस्ट करा
उत्पादक यादी
महोत्सव
लेख
संपर्क
कुरडूची भाजी
साहित्य
कुरडू पाने दोन कांदे पाच लसुन पाकळ्या तीन मिरच्या पाव चमचा हिंग अर्धा चमचा हळद एक टोमॅटो पाव वाटी ओले खोबरे चवी पुरते मीठ अर्धा चमचा साखर २ चमचे तेल
बनवण्याची पद्धत
भांड्यात तेल गरम करुन लसुन, मिरची फोडणीला टाकावी मग हिंग, हळद, कांदा घालुन जरा परतावे. लगेच टोमॅटो आणि कुरडूची चिरलेली भाजी टाकावी. मग झाकण ठेवून जरा शिजु द्यावे. थोड्या वेळाने ढवळून त्यात मीठ, साखर घालावी. परत ढवळून ३-४ मिनीटांनी ओले खोबरे घालावे.
फायदे
मुतखडा आणि मूत्रपिंडाचे विकार: कुरडूच्या बिया आणि मुळांचा रस मूत्रपिंडाचे (किडनीचे) विकार व मुतखड्याच्या समस्येवर पारंपरिक उपचारांत उपयुक्त मानला जातो. पचनक्रिया सुधारते: कुरडूची भाजी पोट साफ ठेवण्यास आणि पचनक्रिया सुधारण्यास मदत करते. रक्तशुद्धी व सूज कमी करणे: आयुर्वेदानुसार ही वनस्पती रक्त शुद्ध करणारी आणि शरीराची सूज किंवा सांधेदुखी कमी करण्यास साहाय्यक ठरते. त्वचेचे आजार: जखमेतून होणारा रक्तस्त्राव थांबवण्यासाठी किंवा त्वचेच्या फोडांवर, एक्जिमा व अल्सरवर कुरडूच्या पानांचा रस किंवा लेप लावतात. पोषक घटकांचा स्त्रोत: यात लोह (Iron), कॅल्शियम, व्हिटॅमिन ए आणि सी भरपूर प्रमाणात असतात, जे डोळे व हाडांच्या आरोग्यासाठी चांगले आहेत.
संबंधित भाजीच्या पाककृती/रेसिपी
चिवळ भाजी
रानघोळ, भुईचौली, खाटेचौनाळ, चिवळी, लहान घोळ व छोटी घोळ
35
भारंगीची भाजी
भारंगी / भारंग
22
हादगा फुलांची भजी
अगस्ता / हादगा / अगस्त्य
19
गावठी अळंबी सावजी स्टाईल
अळंबी / कुत्र्याची छत्री / सात्या / डुबरसात्या / भूछत्र /Mushroom
28
संबंधित भाज्या
वसू / Black Pigweed
Trianthema Portulacastrum
अंबाडी / Ambadi / रेड सोरेल / रोझेल
Hibiscus Sabdariffa
मायाळू / बेलबोडी
Basella Alba
घोळभाजी / Benghal Deflower
Portulaca Oleracea