🌿 कोल्हापुरातील कृषी क्षेत्रातील वैभवाचे डिजिटल पोर्टल
  लॉगिन

टाकळा रानभाजी

साहित्य
1 कप टाकळा भाजी 1/4 कप भिजलेली मूग डाळ 2/3 कट केलेल्या हिरव्या मिरच्या 6/7 लसणीच्या पाकळ्या कट केलेल्या 2 पांढरे कांदे कट केलेले 1 टोमॅटो कट केलेला 1/2 टेबलस्पून लाल मिरची पावडर 1/2 टेबलस्पून धना पावडर 1/2 टीस्पून हळदी पावडर मीठ चवीनुसार 3 टेबलस्पून तेल फोडणीसाठी 1/2 टेबलस्पून मोहरी जीरे 1/4 टीस्पून हिंग
बनवण्याची पद्धत
• एक पातेले घेऊन त्यात एक ग्लास पाणी व खुडलेली भाजी उकळुन घ्यावे. • नंतर त्यातील पाणी नितळुन घ्यावे. • नंतर एक पातेले घेउन त्यात आपल्याला पाहिजे तेवढे तेल, गरम करुन त्यात बारीक चिरलेला कांदा, मिरची, लसुन, जिरा, तिखट, मीठ, हळद, टमाटर तळून घ्यावे. • नंतर त्यामध्ये भाजी टाकुन शिजु द्यावे. नंतर कोथींबीर टाकावे. अशा प्रकारे आपल्या आवडीची भाजी तयार होईल. मेथीच्या भाजीसारखीच टाकळ्याची भाजी करतात किंवा आपल्या आवडीनुसार भाजी बनवू शकता. • हि औषधी तणभाजी असल्याने त्यात साधे मसाले (हिरवी, मिरची, तेल, मिठ) घालुन भाजी बनवावी.
फायदे
त्वचाविकारांवर गुणकारी: टाकळा भाजी खाल्ल्याने इसब (Eczema), ॲलर्जी, सोरायसिस, खरुज आणि गजकर्ण यांसारखे त्वचाविकार दूर होण्यास मदत होते. वात व कफ दोष कमी करते: ही भाजी गुणाने उष्ण असल्यामुळे शरीरातील वात आणि कफ दोष नियंत्रित ठेवण्यास मदत करते. पोटातील कृमी नष्ट करते: लहान मुलांच्या पोटातील जंत किंवा कृमी बाहेर टाकण्यासाठी ही भाजी उपयुक्त ठरते. वजन नियंत्रित ठेवण्यास मदत: नियमित सेवनाने शरीरातील अतिरिक्त मेद (चरबी) कमी होण्यास मदत होते. रक्त शुद्धीकरण: ही रानभाजी नैसर्गिकरीत्या रक्त शुद्ध करण्याचे कार्य करते, ज्यामुळे आरोग्य सुधारते. पोषक घटकांचे प्रमाण: टाकळ्यात फायबर, प्रथिने, ब्युटा-कॅरोटीन, तसेच जीवनसत्त्वे (अ, बी, सी) आणि लोह, कॅल्शियम यांसारखी खनिजे भरपूर प्रमाणात असतात
संबंधित भाजीच्या पाककृती/रेसिपी
कपाळफोडी ची भाजी
कपाळफोडी / फोफांडा
 16
टाकळा रानभाजी
टाकळा / तरोटा / तरवटा / Foetid Cassia
 34
कुड्याच्या फुलांची भाजी
कुडा / इंद्रजव / कुटज / पांढरा कुडा / Konesi Bark Tree
 37
टाकळ्याची भाजी
टाकळा / तरोटा / तरवटा / Foetid Cassia
 47