🌿 कोल्हापुरातील कृषी क्षेत्रातील वैभवाचे डिजिटल पोर्टल
लॉगिन
कोल्हापुर कृषीवैभव
कृषी विभाग, कोल्हापूर महाराष्ट्र शासन
मुख्यपृष्ठ
आमच्याविषयी
रानभाज्या
तालुका निहाय रानभाजी
पाककृती
उत्पादक
उत्पादक नोंदणी
लेख पोस्ट करा
उत्पादक यादी
महोत्सव
लेख
संपर्क
आंबट चुक्याची आमटी
साहित्य
2 वाटी वरण किंवा शिजवलेली तूर डाळ 1 जुडी आंबट चुका निवडून साफ करून त्याची पानं काढलेली व स्वच्छ धुतलेली 15 लसणाच्या पाकळ्या 1 टेबलस्पून तेल 1 टेबलस्पून शेंगदाणे 1/4 चमचा हळद,दीड चमचा तिखट चवीनुसार मीठ,सुपारी एवढा गुळ 1/4 चमचा मेथी दाणा 1/2 चमचा जीरे , अर्धा चमचा मोहरी, चिमूटभर हिंग थोडीशी कोथिंबीर धुऊन बारीक कापलेली
बनवण्याची पद्धत
प्रथम आंबट चुक्याची पाने व दाणे कुकरला शिजवून घ्यावे व घोटून घ्यावे मग ते शिजलेल्या डाळीमध्ये मिक्स करावे त्यामध्ये मीठ व गूळ घालावे व रवीने छान घोटून घ्यावे एक भांड किंवा कढई गॅसवर ठेवून त्यामध्ये तेल घालावे तेल गरम झालं की त्यामध्ये जिरं मोहरी, हिंग मेथी दाणा व ठेचलेला लसूण घालून छान लाल होऊ द्यावा मग त्यामध्ये वरील घोटलेल मिक्सर घालून त्यात हळद तिखट व लागेल तसं पाणी घालावं व छान उकळू द्यावे मग त्यावर कोथिंबीर घालावी एकजीव करावं व अजून मंद गॅसवर पाच मिनिटांसाठी उकळू द्यावं गॅस बंद करावा ही आमटी गरम गरम भाताबरोबर भाकरीबरोबर चपाती बरोबर अतिशय टेस्टी लागते नॅचरली ती आंबट असल्यामुळे आंबट गोड तिखट ही चव खूप सुंदर वाटते
फायदे
पचनक्रिया सुधारते आणि भूक वाढवते बद्धकोष्ठता आणि मूळव्याध यावर गुणकारी पोषक तत्वांनी समृद्ध शरीरातील उष्णता कमी करते वजन कमी करण्यासाठी आणि डिटॉक्सिफिकेशनसाठी उपयुक्त
संबंधित भाजीच्या पाककृती/रेसिपी
दिंड्याची भाजी
दिंडा / ढोलसमुद्रिका
18
आंबट चुक्याची आमटी
आंबटचुका / ब्लॅडर डॉकसॉरेल/ चुका
23
अंबाडीची भाजी
अंबाडी / Ambadi / रेड सोरेल / रोझेल
25
चिवळ भाजी
रानघोळ, भुईचौली, खाटेचौनाळ, चिवळी, लहान घोळ व छोटी घोळ
36
संबंधित भाज्या
करडई पाने
Carthamus tinctorius
दिंडा / ढोलसमुद्रिका
Leea macrophylla
अगस्ता / हादगा / अगस्त्य
Sesbania grandiflora
आंबुटी / आंबाती आंबटी / भुईपर्पटी / चांगेरी / Indian Sorrel
Oxalis Corniculata