🌿 कोल्हापुरातील कृषी क्षेत्रातील वैभवाचे डिजिटल पोर्टल
लॉगिन
कोल्हापुर कृषीवैभव
कृषी विभाग, कोल्हापूर महाराष्ट्र शासन
मुख्यपृष्ठ
आमच्याविषयी
रानभाज्या
तालुका निहाय रानभाजी
पाककृती
उत्पादक
उत्पादक नोंदणी
लेख पोस्ट करा
उत्पादक यादी
महोत्सव
लेख
संपर्क
चिवळ भाजी
साहित्य
चिवळ भाजी तेल बारीक चिरलेला कांदा मिरची लसुन जिरा तिखट मीठ हिंग हळद टमाटर कोथींबीर
बनवण्याची पद्धत
चिवळीची भाजी नीट निवडून घ्या. अगदी पानं पानं घ्यायची गरज नाही. पण त्याची मुळं काढून टाका आणि फक्त् कोवळे देठ ठेवा. नंतर ही भाजी स्वच्छ धुवून घ्या. धुतल्यावर जराशी कोरडी करुन बारीक चिरून घ्या. कढईत तेलाची फोडणी करा. त्यात हिंग घाला. त्यावर कांदा घालुन मध्यम आचेवर कांदा चांगला मऊ होईपर्यंत शिजु द्या. कांदा शिजत आला की लसून-मिरचीचं वाटण घाला. ते परता. खमंग वास आल्यावर हळद आणि मुगडाळ घाला आणि त्यावर भाजी घाला. नीट हलवून घ्या. त्यात तिखट आणि मिठ घाला. परत हलवून घ्या आणि झाकण ठेवून भाजी शिजवा. मुगडाळ हलकी शिजवा फार गाळ करु नका.
फायदे
हृदयाचे आरोग्य: या घोळ भाजीमध्ये ओमेगा-3 फॅटी अॅसिड असते, जे हृदय निरोगी ठेवण्यास मदत करते आणि हृदयविकाराचा धोका कमी करते. रक्तदाब नियंमत्रणात: या भाजीचे सेवन केल्याने उच्च रक्तदाब (Blood Pressure) आटोक्यात राहण्यास मदत होते. पचनक्रिया सुधारते: या भाजीमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते, ज्यामुळे पचनशक्ती सुधारते आणि वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत मिळते. रोगप्रतिकारशक्ती: यामध्ये असणारे अँटी-ऑक्सिडंट्स शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास उपयुक्त ठरतात. मुतखडा आणि किडनी: या वनस्पतीचे नियमित सेवन केल्याने किडनी आणि मूत्राशयाचे आरोग्य सुधारण्यास मदत होते.
संबंधित भाजीच्या पाककृती/रेसिपी
भारंगीची भाजी
भारंगी / भारंग
22
हादगा फुलांची भजी
अगस्ता / हादगा / अगस्त्य
19
घोळ भाजी
घोळभाजी / Benghal Deflower
30
खापरखुटी ची भाजी
खापरखुटी / पुनर्नवा
27
संबंधित भाज्या
गुळवेल / वारुडवेल / अमृतवेल / अमृतवल्ली / गुडूची / Heart-leaved moonseed / Tinospora
Tinospora cordifolia
खापरखुटी / पुनर्नवा
Boerthavia diffusa
हरभऱ्याची भाजी
Cicer arietinum.
कडीपत्ता / गोडनींब / Curry Leaves
Murraya koenigii