🌿 कोल्हापुरातील कृषी क्षेत्रातील वैभवाचे डिजिटल पोर्टल
  लॉगिन

करडई भाजी

साहित्य
1 जुडी करडई 2 कांदे 1 टेबलस्पून हिरवी मिरची लसूण पेस्ट 2 टेबलस्पून तेल 1/4 टीस्पून जीरे 1/4 टीस्पून मोहरी आवडीनुसार शेंगदाणे कूट, किंवा नारळाचा चव घालू शकता
बनवण्याची पद्धत
करडई भाजी निवडून घ्या.. शक्यतो पाने च घ्यावीत..देठ जास्त घेऊ नये.. स्वच्छ निवडून, धुवून, बारीक कापून घ्या.. कढईत तेल गरम करून त्यात मोहरी जीरे फुलले की हिंग, हिरवी मिरची लसूण पेस्ट घालून परतून घ्या.. कांदा घालून ट्रान्स्फरन होईपर्यंत परतून घ्या आता भाजी घालून मिक्स करा. दोन मिनिटातच भाजी खाली बसेल म्हणजे नरम होईल..मगच अंदाजाने मीठ घालावे..व झाकण ठेवून मंद गॅसवर वाफेवर शिजू द्यावी.. अजिबात पाणी घालायचे नाही.. आपोआप भाजीला ओलसरपणा येतो.. दहा मिनिटात भाजी तयार होते. आवडीनुसार शेंगदाणे कूट किंवा नारळाचा चव घालू शकता.. आम्ही नाही घालत... भाकरी, चपाती सोबत सर्व्ह करा..
फायदे
पचनक्रिया सुधारते: करडईच्या भाजीमध्ये भरपूर तंतुमय पदार्थ (फायबर) असतात, जे पचनक्रिया सुधारण्यास आणि बद्धकोष्ठता (Constipation) दूर करण्यास मदत करतात. तसेच ही भाजी भूक वाढवण्याचे काम करते हिमोग्लोबिन वाढवते: या पालेभाजीमध्ये लोह (Iron) आणि व्हिटॅमिन 'ए' चे प्रमाण चांगले असते, ज्यामुळे रक्तातील हिमोग्लोबिन वाढण्यास आणि अशक्तपणा दूर होण्यास मदत होते. करडईची पाने रक्तातील विषारी घटक (Toxins) बाहेर टाकून रक्तशुद्धी करतात. त्वचेवरील डाग आणि उष्णतेमुळे होणारा दाह कमी करण्यासाठी ही उपयुक्त ठरते. सूज व सांधेदुखी कमी करते: यामध्ये असलेल्या अँटी-इन्फ्लेमेटरी (Anti-inflammatory) गुणधर्मांमुळे शरीरातील सूज, सांधेदुखी आणि पोटदुखीमध्ये आराम मिळतो हृदयाचे आरोग्य: या पानांमध्ये पोटॅशियम आणि अँटिऑक्सिडंट्स असतात, जे रक्ताभिसरण सुधारून रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास आणि हृदय निरोगी ठेवण्यास मदत करतात वात व कफ दोष कमी करते: आयुर्वेदानुसार, करडईची भाजी शरीरातील वात आणि कफ दोष संतुलित ठेवते
संबंधित भाजीच्या पाककृती/रेसिपी
वायवर्णाची भाजी
वरुण / हाडवर्णा / वायवर्णा
 42
अळंबी भाजी
अळंबी / कुत्र्याची छत्री / सात्या / डुबरसात्या / भूछत्र /Mushroom
 24
आंबट चुक्याची आमटी
आंबटचुका / ब्लॅडर डॉकसॉरेल/ चुका
 22
कढीपत्ता चटणी
कडीपत्ता / गोडनींब / Curry Leaves
 26
संबंधित भाज्या